चिंचोली गुरव गावात प्रभू श्रीराम भक्त वानरराजाचा मूर्ती प्राणप्रतिष्ठा व दशक्रियाविधी सोहळा संपन्न..!!
संगमनेर (दत्तात्रय घोलप):-संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव गावामध्ये दहा दिवसापूर्वी विजेचा शॉक लागून एका वानराचा दुर्दैवी अंत झाला होता.यानंतर सर्व गावकऱ्यांनी एकत्र येत लगेचच मयत झालेल्या वानराचा अंत्यविधी सोहळा विधिवात पद्धतीने पार पाडला.आज मंगळवार दिनांक 1 जुलै 2025 रोजी सकाळी 9 वाजता सदर वनराजाच्या स्मृतिप्रत्यर्थ चिंचोली गुरव गावामध्ये हनुमान मंदिराच्या बाजूलाच पारंपरिक पद्धतीने विधिवत वानरराज्याची प्राणप्रतिष्ठापना करुन दशक्रियाविधी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला आहे.
प्राणीमात्रांवर दया करा,त्यांना देखील भावना असतात.त्या आपण जपल्या पाहिजे व त्यांच्या प्रती देखील आपण आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे म्हणुनच या आगळ्यावेगळ्या कृतीशील उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.सदर कार्यक्रमाचे निमित्ताने भव्य महाआरती करण्यात आली.वानरराजाचा दशक्रियाविधी तसेच मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने समाजप्रबोधन ह.भ.प अरुण महाराज दिघे यांची सकाळी 10 वाजता किर्तनसेवा संपन्न झाली.भाविकांसाठी यानिमित्ताने महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते.मोठ्या संख्येने ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भावीक, नागरिक मोठ्या संख्येने कार्यक्रमासाठी हजर होता.गावातील बजरंग दल,विविध हिंदुत्ववादी संघटना तसेच ग्रामस्थांचे देखील मोठे योगदान धार्मिक कार्यक्रमासाठी लाभले आहे.