माणुसकी…न्यु सुवार्ता तारण मंडळी संचलीत,अंध,अपंग व वृध्द निराधारांची सेवा व सांभाळ करण्यासाठी बांधण्यात आलेल्या मनःशांती आश्रमाचे खा.निलेश लंके यांच्या हस्ते उदघाटन…मनशांती आश्रमातून अंध,अपंग व वृध्द निराधारांना मिळणार आधार..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-भिंगार येथील न्यु सुवार्ता तारण मंडळी संचलीत,मनशांती आश्रम येथे अंध,अपंग व वृध्द निराधारांची सेवा व सांभाळ करण्यासाठी बांधण्यात आलेल्या आश्रमाच्या नवीन वास्तूचे उदघाटन अहिल्यानगर दक्षिणचे लोकप्रिय खासदार निलेश लंके यांचा शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी खासदार निलेश लंके यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले की,विजय पंडित यांनी आयुष्यातील 35 ते 40 वर्ष नोकरी करून त्यातून आलेल्या पैशातील काही पैसे बचत करून निस्वार्थी भावनेने हा एवढा मोठा आश्रम त्यांनी सुरू केलाय त्याचा मला अभिमान वाटतोय,कुटुंबाचा विचार न करता हे अंध अपंग व निराधार लोक आपल्याच कुटुंबातील आहेत त्याच भावनेतून विजयराव पंडित यांनी चाळीस खाटांचे मनशांती आश्रम सुरू केले.
ज्या ज्या वेळेस आमची मदत लागेल त्या त्या वेळेस या आश्रमाच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहणार असल्याची भावना यावेळी खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केली.अंध,अपंग,निराधार गरजवंतांनी या मनशांती आश्रमात येण्यासाठी पंडित यांनी संपर्क करण्याचे आवाहन देखील यावेळी केले.यावेळी संस्थापक विजय पंडित,मम्मा मकासरे,रवी दाते,नानाजी डोळ,अध्यक्ष विशाल पंडित,सरपंच अरूणा कांबळे,विनय पहिलवान,नितीन गवारे,प्रतीक साळवे,मिरूलाल सोनवणे,अनिल पातरे,संगीता शिंदे,मनोहर बनसोडे,मोजस पाटोळे,संदेश पंडित,रावसाहेब सरोदे आदी उपस्थीत होते. कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर विकास पंडित यांनी सर्वांचे आभार मानले.व अंध अपंग व निराधार लोकांना व तसेच परिसरातील नागरिकांना पंडित कुटुंबीयांच्या वतीने भोजनदान देण्यात आले.