घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्यांना पकडण्यात भिंगार कॅम्प पोलिसांना यश
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-घरफोडी करणारे अट्टल चोरट्यांना पकडण्यात भिंगार कॅम्प पोलिसांना यश आले आहे.
दि.२४/०५/२०२५ रोजी फिर्यादी मयुर बद्रीनाथ बेद्रे, (धंदा इलेक्ट्रीक दुकान,रा. द्वारकाधिश कॉलनी,आलमगीर रोड,भिंगार,ता.जि.अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली की, माझे श्री. इलेक्ट्रीकल्स दुकान,भिंगार वेशीजवळ,न्यु कोना जनरल स्टोअर समोर,भिंगार अहिल्यानगर येथे दुकानातील इलेक्ट्रीकल्स साहीत्य व गल्ल्यातील रोख रक्कम कोणीतरी अज्ञात चोरटयाने घरफोडी चोरी करुन चोरुन नेले बाबत भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे गु.र.न. ३७०/२०२५ भा.न्या.स. ३३१ (४), ३०५ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचे तपासकामी घटना ठिकाणी व भिंगार शहर परिसरात गुप्त बातमीदारामार्फत व तांत्रीक विश्लेषनादवारे तपास करीत असताना सपोनि.जगदीश मुलगीर यांना सदरचा गुन्हा हा १) राकेश राजु भोसले, वय २३ वर्षे, रा. घर नं. ११६८, लक्ष्मीनगर,भिंगार टेकडी,भिंगार ता.जि.अहिल्यानगर व २) मनोज दिलीप बाबर, वय २३ वर्षे,रा.घर नं.०६ नेहरु कॉलनी,भिंगार ता.जि. अहिल्यानगर यांनी केल्याचे गुप्त बातमी मिळाल्याने सपोनि जगदीश मुलगीर यांनी सदर गुन्हयाचे तपासी अंमलदार पाहेकॉ/२१५ व्ही.आर गारुडकर, तसेच पोहेकॉ/१४३७ बापुसाहेब म्हस्के, पोहेकॉ/८५९ मोहन भेटे व पोना/२३६ शाहीद शेख यांना आरोपी अटक करुन गुन्हा उघड करणेबाबत सुचना दिल्याने पाहेकॉ/२१५ व्ही. आर गारुडकर, तसेच पोहेकॉ/१४३७ बापुसाहेब म्हस्के,पोहेकॉ/८५९ मोहन भेटे व पोना/२३६ शाहीद शेख यांनी गुन्हयातील आरोपींचा भिंगार कॅम्प पो.स्टे हददीत शोध घेवुन ते मिळुन आल्याने त्यांना सदर गुन्हयात अटक करुन विश्वासात घेवुन गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्यांनी सदर गुन्हयाची कबुली देवुन गुन्हयातील गेलामाल एकुण ९९००/- रु. कि.चा मुददेमाल त्यामध्ये ०५ सर्विस वायर बंडल, ०१ मल्टीगेल वायर बंडल, सेलो टेप ०१ बंडल व रोख रक्कम असा मुददेमाल काढुन दिल्याने सदरचा मुददेमाल गुन्हयाचे तपासकामी जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक श्री.सोमनाथ घार्गे,अप्पर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागिय पोलीस अधिकारी श्री.अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि जगदीश मुलगीर, पोहेकॉ/२१५ विलास गारुडकर, पोहेकॉ/१४३७ बापुसाहेब म्हस्के, पोहेकॉ/८५९ मोहन भेटे व पोना/२३६ शाहीद शेख यांनी केली आहे.