कर्तृत्ववान तरुण शेतकऱ्याचे अल्पशा आजाराने निधन..एका महिन्याच्या आत वडील आणि मुलाच्या निधनाने गडाख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला
संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):- संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील तरुण शेतकरी बाबासाहेब गोपाळा गडाख यांचे अल्पशा आजाराने दुःखत निधन झाले.हिवरगाव पावसा येथील ज्येष्ठ नागरिक गोपाळा गडाख यांचे वृद्धापकाळाने निधन झाले त्यानंतर चार दिवसांनंतर मोठा मुलगा बाबासाहेब गोपाळा गडाख यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.त्यांना उपचारा करता खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.एका महिन्याच्या आत वडील आणि मुलाच्या निधनाने गडाख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अल्पभूधारक शेतकरी बाळासाहेब गडाख यांनी उत्पादक आणि विक्रेता अशी दुहेरी भूमिका निभावत भाजीपाला,डाळिंब शेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर केली आहे.पाच एकरांपैकी काही क्षेत्र त्यांनी भाजीपाला पिकांसाठी राखीव ठेवले.त्यात ते वर्षभर विविध भाज्यांचे उत्पादन घेतात.अत्यंत संघर्षातून, कष्टांमधून त्यांनी आपले कौटुंबिक जीवन आनंदी,सुखी ठेवले.कुटुंबाची आर्थिक प्रगती केली.बाबासाहेब गडाख हे गावातील अल्पभूधारक शेतकरी त्यांची पाच एकर शेती आहे.घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची होती.कोरडवाहू शेतीतून उत्पन्न मिळत नसे.त्यामुळे शिक्षण अर्धवट सोडून द्यावे लागले.घराला आर्थिक आधार देण्यासाठी शेती व्यवसाय सांभाळू लागले.वडील गोपाळा गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्यासोबत ते घरची शेती विकसित करू लागले.विहीर खोदून शाश्वत ओलिताची सुविधा तयार केली.एका मळ्यातून दुसऱ्या मळ्यात लांब अंतरावरून पाईपलाइन केली.
त्यात बारमाही वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला ते घेत. अन्य क्षेत्रात सोयाबीन,हरभरा, मका,बाजरी हंगामी पिके घेत कुटुंबाच्या आर्थिक प्रगती साधली.बाबासाहेब गडाख या कर्तुत्ववान कष्टाळू मेहनती तरुण शेतकऱ्याच्या निधनामुळे वडगाव पावसा पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले दोन भाऊ,भावजय,पुतणे असा मोठा परिवार आहे. बाबासाहेब गडाख यांचा दशक्रिया विधी सोमवार दिनांक १४ जुलै २०२५ रोजी, सकाळी८.३० वाजता प्रवारातीरी संगमनेर खुर्द,तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर येथे होणार आहे.