मनपा आयुक्तांकडून समस्त आंबेडकरी समाजाला मोठा धक्का…डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा अनावरणाची शासकीय तारीख अद्यापही निश्चित नाहीच आयुक्तांनी दिले पत्र..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-गेली अनेक वर्षापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची मागणी समस्त आंबेडकरी समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली असून ही मागणी मान्य झाली व जुन्या पुतळ्याशेजारी नवीन पुतळा उभारण्यासाठी सुशोभीकरण करण्यात आले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा देखील बसवण्यात आला मात्र अद्यापही पुतळ्याचे अनावरण करण्यात आले नसून हा पुतळा झाकलेल्या अवस्थेमध्येच आहे.

मात्र मनपा प्रशासनाकडून पूर्णाकृती पुतळ्याची काय तयारी सुरु आहे असे विचारण्यासाठी गेलेल्या समाज बांधवांना मनपा आयुक्त म्हणाले की,२७ तारखेला अनावरण करण्या येत आहे याविषयी कुठलीही पूर्वकल्पना नाही त्यामूळे आम्ही तारीख निश्चित करून अधिकृत पत्र काढू व त्यावेळी सर्वांना कळवू असे आयुक्त यांनी म्हटले मात्र येणाऱ्या २७ तारखेला पुतळ्याचे अनावरण होणार की फक्त आंबेडकरी समाज बांधवांची दिशाभूल होणार असा एक प्रश्न निर्माण झाला आहे.यावेळी समस्त आंबेडकरी समाजाला मनपा आयुक्त यांच्याकडून सांगण्यात आले की,लवकरात लवकर महापालिकेमार्फत प्रेस नोट देऊन अधिकृत तारीख कळविण्यात येईल असे पत्रच आयुक्तांकडून समाज बांधवांना देण्यात आले.