अखेर अश्लील चाळे करणारा ‘अर्धवट टकला’ तोफखाना पोलिसांच्या ताब्यात..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-निर्जन,निर्मनुष्य रस्त्याचा फायदा घेत अल्पवयीन मुलींना पाहुन अश्लील चाळे करणाऱ्या बाईलवेड्या आरोपीस तोफखाना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.दि.२९ जुलै २०२५ रोजी सायंकाळच्या सुमारास सिद्धदाता कॉलनी,प्रोफेसर चौक जवळ, सावेडी ला. जि. अहिल्यानगर सुरेश किड्स या नर्सरी शाळेसमोर रोडवर फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुली खेळत असताना सदर ठिकाणी लाल काळ्या रंगाची प्लेझर मोपेड मोटारसायकलवर डोक्यास अर्धवट टक्कल असलेला,अंगात पांढरा फूलशर्ट व निळी जिन्स घातलेली असा अनोळखी इसम आला व त्याने मोटारसायकलवरुन खाली उतरून अश्लील हावभाव करन, खायचे का? असे म्हणाला असता सदर ठिकाणी मुली घाबरुन पळून गेल्या,त्यानंतर सदर ठिकाणी लोक आल्याने सदरचा इसम मोपेड मोटारसायकलवर बसून पळून गेला वगैरे मजकुराचे फिर्यादी वरुन तोफखाना पोलीस स्टेशन येथे गु.र.नं ७९४/२०२५ मा.न्या.सं.क-७७, ७९ सह बालकांचे लंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कलम ११, १२ गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या गांभीर्य लक्षात घेवुन तोफखाना पो.नि. श्री.आनंद कोकरे यांनी त्यांचे पथकातील अंमलदारांना तात्काळ आरोपी शोधण्याचे आदेश दिले असता नमुद घटनास्थळाची पाहणी करुन आजुबाजूस असलेले सी.सी.टी.व्ही फुटेज प्राप्त करण्यात आले.त्यानंतर फूटेज मधील आरोपीचा शोध घेत असताना फुटेज मधील इसम आरोपी योगेश सिताराम खोटे हा असल्याची माहिती प्राप्त झाल्याने आरोपीचा शोध घेवून आरोपी योगेश सिताराम खोटे, (वय-३३,रा.साहिल हौसिंग सोसायटी,निलगीरी पार्क, तांबटकर मळा,ता.जि. अहिल्यानगर) यास एम. आय.डी.सी. परिसरातुन शिताफिने ताब्यात घेतले असता आरोपीने सदर गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यास सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी सपोनि.मंगेश गोंटला यांच्याकडे पुढील कारवाईकामी ताब्यात दिले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक श्री.वैभव कालूबर्मे,उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती नगर शहर विभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.आनंद कोकरे, पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर,पो.हे.कॉ भानुदास खेडकर,पो.कॉ.सुमित गवळी, अविनाश बर्डे,सतिष त्रिभूवन, भागवत बांगर यांनी केली आहे.