दोनशे रुपये दिलेले बापाला मागितल्याचा राग अनावर पाठीत खिळाच भोकसला एकाचा खून
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अवघ्या दोनशे रुपये उसनवारीतून झालेल्या वादात मित्राने मित्राचा खून केल्याची घटना अहिल्या नगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे घडली आहे.मतीन मेहबूब शेख (वय २५),असे मयत व्यक्तीचे नाव आहे.याप्रकरणी चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून,चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.मयत मतीन शेख याची आई बिलकीस ऊर्फ शाकिरा महेमूद शेख यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शुक्रवारी (दि.८) रात्री ०८.४५ वाजेच्या सुमारास मुजफ्फर याला आसीफ शेख याने फोन करून मतीन यांच्या पाठीत खिळा घुसला आहे.तुम्ही तात्काळ लोणी येथील प्रवरा रुग्णालयात या,असे सांगितले.
बिलकीस शेख रुग्णालयात गेल्या असता मुलगा मतीन बसलेला होता.त्याने प्रतापपूर शिवारातील शासकीय विश्रामगृहा शेजारी मंदिराजवळ बसलो असताना आसीफ सलीम शेख,सोहेल आंधळे,पप्पू भांड,गौतम गायकवाड यांच्या बरोबर माझी बाचाबाची झाली आहे आसीफ शेख याला उसने दिलेले दोनशे रुपये त्याच्या वडिलांकडे मागितल्याचा राग आल्याने त्याने पाठीत खिळा भोसकून जखमी केल्याचे आई बिलकीस मतीन हिला सांगितले.जखमी मतीन याच्यावर प्रवरा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारसाठी पुणे येथे दाखल केले.मात्र,सकाळी औषधोपचारादरम्यान मतीन याचा मृत्यू झाला.दरम्यान,आश्वी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून चारही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.