जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ मोठ्या कंटेनरची चारचाकी वाहनांना धडक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-डीएसपी चौकाजवळील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया जवळ एका भरधाव कंटेनरने तब्बल सात ते आठ चारचाकी वाहनांना धडक दिली.यामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ही घटना दि.13 सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे.यावेळी पाऊसही जोरदार सुरु होता.कंटेनर चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.सकाळी उशिरा पोलीस अधीक्षक कार्यालय शेजारील असलेल्या गटारीमध्ये धडकून एक गाडी फसली होती ती पोलिसांच्या सहकार्याने काढण्यात आली.