शिवसेना उबाठा (ठाकरे) पक्षाचा हाबाडा.. आंदोलनाचा धसका राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कामास तातडीने सुरुवात..
धाराशिव प्रतिनिधी (अजित चव्हाण):-जळकोट-सोलापूर – हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गावर नळदुर्ग ते जळकोट दरम्यान प्रचंड मोठे खड्डे पडले असून ठिकठिकाणी पावसाचे पाणी मोठया प्रमाणावर साचले आहे.
त्यामुळे वहातुकीस अडथळा निर्माण होऊन अपघात होत आहेत. याबाबत तातडीने सदर महामार्गावरील खड्डे बुजवून साचलेले पाणी काढून द्यावे.यासह इतर अपूर्ण कामे पूर्ण करण्याबाबत शिवसेना उबाठा (ठाकरे) पक्षाच्या वतीने नुकतेच प्रकल्प संचालक,राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण सोलापूर यांना निवेदन देऊन फुलवाडी येथील टोलनाका बंद करून आंदोलन केले होते.वाहनधारकांकडून होणारी वसुली बंद करून, कार्यवाही न केल्यास टोलवसुली कायमचीच बंद करणेसाठी टोलनाकाच उद्धवस्त करून टाकु असा इशाराही देण्यात आला होता. तसेच त्यानंतर जळकोट येथे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रशांत नवगिरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला. यावेळी या अधिकाऱ्यांनी, आपल्या मागणीप्रमाणे सर्व कामे तात्काळ सुरू करण्यात येतील असे सांगितले.

अखेर शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या आंदोलनाची गंभीर दखल घेऊन आज जळकोट – नळदुर्ग दरम्यान महामार्गावरील मोठे खड्डे बुजविण्यास सुरुवात केली. यामुळे काही काळ वहातुक जाम झाली होती. या ठिकाणी वहातुक सुरळीत करण्यासाठी वहातुक पोलीसांची मदत घेण्यात आली. खड्डे बुजविण्याचे काम प्रशांत नवगिरे, जळकोट शहरप्रमुख संतोश वाघमारे, युवा सेना उपतालुकाप्रमुख रोहन (दादा) पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह समोर थांबून करून घेतले. या कामामुळे वाहनधारकांतून समाधान व्यक्त केले जात असून त्यांचेकडून शिवसेना कार्यकर्त्यांचे कौतुक केले जात आहे.