चारचाकी वाहनावर 7/12 नंबर..मंडळाधिकारी दिलीप जायभाय अखेर निलंबित
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाने पारनेर तालुक्यात कार्यरत असलेला तत्कालीन मंडळाधिकारी दिलीप श्रीधर जायभाय यांना निलंबित करण्याचा आदेश दिला आहे.
सावेडी येथील जमीन फेरफार प्रकरणात गंभीर अनियमितता झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ च्या कलमान्वये शिस्तभंग विषयक कारवाईस प्रारंभ करण्यात आला असून,तत्कालीन सावेडी मंडळाधिकारी दिलीप जायभाय यांना तत्काळ शासन सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

तसेच ग्राममहसूल अधिकारी सावेडी (तलाठी) सध्या कार्यरत निंबळक ग्रामपंचायत प्रमोद दत्तात्रय गायकवाड यांनाही याच प्रकरणात शासन सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.