पारनेर मध्ये मनसे भरवणार रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचे प्रदर्शन..
पारनेर (प्रतिनिधी):-पारनेर तालुक्यात गेल्या तीन-चार वर्षांत झालेल्या नवीन रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्रांज्य तयार झाल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पारनेर मध्ये खड्ड्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार असल्याचे मनसे नेते अविनाश पवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.
दिवसातून चार वेळा पारनेर-सुपा रोडने प्रवास करणारे आमदार,खासदार पारनेर सुपा रोड मुत्युंचा सापळा बनला असताना गप्प का असा प्रश्न मनसे नेते अविनाश पवार यांनी उपस्थित करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारुन धारेवर धरत दोन दिवसांत जर रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले नाही तर बांधकाम विभागाच्या कार्यालयात मनसे स्टाईल तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देताच सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागे होत पारनेर- सुपा रोडवरील खड्डे बुजविण्यास सुरवात करण्यात आली असल्याचे आज निदर्शनास आले आहे.पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की पारनेर च्या जनतेनी विश्वासाने दोन्ही लोकप्रतिनिधी ना भरभरून मतदान करुन विश्वास टाकला होता पण सध्या तरी जनतेला गृहीत धरून तेरी भी चूप मेरी भी चूप अशा प्रकारे साट-लोट करून राजकारण चालू असल्याचे यावरुन स्पष्ट होत आहे.आश्चर्याची बाब म्हणजे आमदार काशिनाथ दाते साहेब यांना घरी जाण्यासाठी हाच रस्ता आहे तसेच खासदार निलेश लंके साहेब सुद्धां दिवसांत चार वेळा या रोडने प्रवास करताना दिसतात आणि विशेष बाब म्हणजे आमदार काशिनाथ दाते सर आणि खासदार निलेश लंके यांचे ही जनसंपर्क कार्यालय याच रोडवर आहे.
दोघांच्याही जनसंपर्क कार्यालया समोरच काही अंतरावर रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे तरीही दुरुस्तीसाठी दोघं ही *ब्र* शब्द काढायला तयार नाहीत हे न उलगडणारे कोडे आहे आहे त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने लवकरच पारनेर तालुक्यातील गेल्या तीन-चार वर्षांत नवीन झालेल्या रस्ता कामांची माहिती घेऊन सर्व रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचे प्रदर्शन पारनेर शहरात तहसील कार्यालया समोर आयोजित करण्यात येणार असल्याचे मनसे माथाडी कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष अविनाश पवार यांनी सांगितले.
