वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे यांच्या हाती शिवबंधन..नगर शहरात उबाठा ची ताकद वाढणार
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे यांनी (उबाठा) शिवसेनेचे अहिल्यानगर शहराध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली दि.20 सप्टेंबर 2025 रोजी शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबई येथे मातोश्री येथे पक्षप्रवेश केला.
सध्या अहिल्यानगर येथील अस्थिर राजकीय वातावरणात पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी व शहर प्रमुख किरण काळे यांच्या मागे खंबीरपणे उभे राहणे गरजेचे वाटल्याने शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे प्रतीक बारसे यांनी यावेळी सांगितले.शिव,शाहू, फुले,आंबेडकर,अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांनी आजपर्यंत आंबेडकरी चळवळीतील एक स्वच्छ चेहरा असलेले प्रतीक बारसे यांनी शिवबंधन हाती बांधल्याने शहरातील राजकारण बदलणार आहे.तसेच या प्रक्षप्रवेशाने आगामी येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत उबाठा गटाला फायदा होणार आहे.दांडगा जनसंपर्क व सर्व सामान्यांच्या मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता मिळाल्याने किरण काळे यांची शहरात ताकत वाढणार आहे.

या पक्ष प्रवेशाला स्वतःपक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,खासदार संजय राऊत,नेते विनायक राऊत,अहिल्यानगर शहर प्रमुख किरण काळे,अनिस चुडिवाला, सुनिल भोसले,विलास उबाळे, ओंकार वडे,अभिषेक बारसे, धरम परदेशी,प्रविण पवार, अमोल कारंडे,नदीम शेख, अंबादास सोले,सचिन वाघमारे आदीसह शकडो कार्यकर्ते उपास्थित होते.