जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा पोलीस मुख्यालय येथे संपन्न.. पोलीस मुख्यालय विभागाचा दबदबा कायम सर्वसाधारण विजेतेपद पटकावले..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- अहिल्यानगर जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा 2025 पोलीस मुख्यालय येथे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाल्या.दि.१८ सप्टेंबर २०२५ ते दि.२२ सप्टेंबर २०२५ या कालावधी क्रीडा स्पर्धा आयोजीत करण्यात होत्या.यामध्ये पोलीस मुख्यालय नगर शहर विभाग,श्रीरामपुर, कर्जत,शेवगाव,शिर्डी व संगमनेर अशा विभागांनी सहभाग घेतला होता.

सदर स्पर्धेत कबड्डी, खोखो,हॅण्डबॉल,फुटबॉल, बास्केटबॉल,व्हॉलीबॉल,कुस्ती, बॉक्सींग,ज्युडो तसेच मैदानी स्पर्धा अशा विविध प्रकारच्या खेळांचे उत्तम आयोजन करण्यात आले होते.सदर स्पर्धे मध्ये खेळाडुंनी अत्यंत हिरीरीने भाग घेतला.दि.२२ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी श्री. डॉ.पंकज आशिया व जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांचे उपस्थितीत सदर क्रीडा स्पर्धेचे समारोपन पार पडले क्रीडा स्पर्धेत पोलीस मुख्यालय विभागाने सर्व साधारण विजेते पद पटकावले.जिल्हाधिकारी आशिया यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले तर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांनी आगामी नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रिडा स्पर्धे मध्ये अहिल्यानगर जिल्हयातील पोलीस खेळाडू विशेष पदके पटकावुन आपल्या जिल्हा पोलीस दलाचे नावलौकीक करतील असे प्रोत्साहन व मार्गदर्शन केले.
तसेच समारोप समारंभासाठी उपस्थित असलेले सर्व पोलीस अधिकारी,खेळाडु पोलीस अंमलदार व अहिल्यानगर शहरातील प्रतिष्ठीत मान्यवर,पत्रकार बंधु,प्रसिध्दी माध्यमांचे प्रतिनीधी,पंच क्रीडा मार्गदर्शक यांचे देखिल अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातर्फे आभार मानण्यात आले.