बनावट कागदपत्रांच्या आधारे परप्रांतीय कामगारांची सुपा मतदारयादी मध्ये नोंद..अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन कारवाई करा..बनावट आधारकार्ड बनवून देणारे कॅप्युटर चालक,नोंद करणाऱ्या,बी.एल.ओ.अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा-मनसे नेतेअविनाश पवार.
पारनेर (प्रतिनिधी):- सुपा औद्योगिक वसाहतीतील परप्रांतीय कामगारांची काही राजकीय लोकांकडून स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी सुपा गावच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या परप्रांतीय लोकांचे कसल्याही प्रकारचे व्हेरिफिकेशन न करता फक्त आधारकार्ड चा समोरील बाजुचा फोटो घेऊन ऑनलाईन पद्धतीने अफरातफर करून बी.एल.ओ.सोबत आर्थिक व्यवहार करुन सुपा ग्रामपंचायत मतदारयादी मध्ये ड्युब्लिकेट कागदपत्रांच्या आधारे हेराफेरी करून मोठ्या संख्येने नोंद झाली असल्याची धक्कादायक माहिती सुपा येथील जागृत नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निदर्शनास आणून दिली.
हा गंभीर प्रकार असल्यामुळे याची ग्रामपंचायत मध्ये चौकशी केली असता परप्रांतीय लोकांना कोणत्याही प्रकारचे रहिवासी दाखला दिला नसल्याचे सरपंच व ग्रामसेवक यांनी सांगितले तसेच सुपा ग्रामपंचायत मध्ये परप्रांतीय लोकांची मतदारयादी मध्ये नोंद न करण्याबाबत ठराव झाला असल्याचे सरपंच व ग्रामसेवक यांनी सांगितले त्यामुळे बी.एल.ओ.ने.कशाच्या आधारे नोंद केली याबाबत पारनेर तहसीलदार यांना निवेदन देऊन निवडणूक शाखेकडून याबाबत लिखीत स्वरुपात खुलासा करण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सूचित करत मागणी केली आहे की या परप्रांतीय लोकांना ड्युब्लिकेट कागदपत्रे काढण्यासाठी मदत करणारे संबंधितअधिकारी,बी.एल.ओ.,कॅप्युटर चालक,आधार केंद्र चालक ज्यांनी परप्रांतीय लोकांना ड्युब्लिकेट कागदपत्रांच्या आधारे नोंद करण्यासाठी मदत केली.
त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी तहसीलदार यांना केली असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष अविनाश पवार यांनी सांगितले जर या गंभीर गोष्टीचा गांभीर्याने विचार करुन त्वरित आठ दिवसांत कारवाई झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तहसील कार्यालयात सुपा गावच्या सुरक्षिततेला धोका निर्माण केल्यामुळे मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येणार असल्याचे पवार यांनी प्रसिद्धीं पत्रकाद्वारे सांगितले.