लग्नाचे आमिष दाखवत अमृततुल्यच्या मॅनेजरने शिक्षिकेची केली फसवणूक…तब्बल 22 लाख 13 हजारांचा गंडा..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-लग्नाचे खोटे आश्वासन देऊन एका ४२ वर्षीय शिक्षिकेल २२ लाख १३ हजार रुपयांना गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.याप्रकरणी पीडित शिक्षिकेच्या फिर्यादीवरून प्रियकर अक्षय रामदास काळे, त्याची आई आणि बहीण (सर्व रा. काळेवाडी,अस्तगाव,ता. पारनेर) यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या पीडित शिक्षिकेची ओळख २०१९ मध्ये ‘येवले अमृततुल्य’ चहाच्या दुकानात मॅनेजर असलेल्या अक्षय काळे याच्याशी झाली होती.ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि अक्षयने शिक्षिकेला लग्राचे वचन दिले.हे लग्न करण्यासाठी अक्षय आणि त्याच्या कुटुंबीयांनी वेळोवेळी शिक्षिकेकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली.अक्षय काळे याने चहाची शाखा परस्पर विकून टाकली आणि शिक्षिकेशी लग्न करण्यास टाळाटाळ करू लागला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित शिक्षिकेने अखेर पोलीस ठाणे गाठले.या कर्जाचे हप्ते अजूनही आपल्या पगारातून जात असल्याचे पीडित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून,अधिक तपास पोलीस करत आहेत.