सोनई घटनेच्या निषेधार्थ उपविभागीय अधिकारी यांना काँग्रेसचे निवेदन
संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):-अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सोनई येथे संजय वैरागर या मातंग समाजातील 22 वर्षीय तरुणावर जातीयवादी गाव गुंडांनी अमाननीय कृत्य करत अमानुषपणे मारहाण केली.

या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने संगमनेर उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी व पोलीस उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.घटनेचा निषेध व्यक्त करून या आरोपींना कठोर कारवाई करून अहिल्यानगर जिल्हा हा दलित अत्याचार ग्रस्त जाहीर करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष बंटी भाऊ यादव,जिल्हा कार्याध्यक्ष अरुण काका गावित्रे,जिल्हा उपाध्यक्ष संतोष गायकवाड,जिल्हा सरचिटणीस शशिकांत थोरात, जिल्हा उपाध्यक्ष रामनाथ गायकवाड, तालुकाध्यक्ष अशोक शेळके,तालुका काँग्रेस प्रवक्ते तुकाराम भोसले,तालुका कार्याध्यक्ष दगडू साळवे,संगमनेर शहर काँग्रेसचे अध्यक्ष सोनु गायकवाड,सचिनज साळवे,जिल्हा सोशल मीडिया काँग्रेसचे समन्वयक उदय अभंग, जिल्हा सरचिटणीस नितीन साळवे,जिल्हा काँग्रेसचे विनोद गायकवाड,प्रवीण आव्हाड, सचिन गायकवाड,शहाजी पवार, भागवत आव्हाड,लक्ष्मण गायकवाड,श्रवण गायकवाड यांच्या सह काँग्रेसचे इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
