🔷अहिल्यानगर मनपात उद्या भीमसैनिकांचा नारा अर्धाकृती पुतळा,सीसीटीव्ही आणि चौकाच्या नामफलकासाठी आयुक्तांना निवेदन चळवळीतील सर्व भीमसैनिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-आंबेडकरी चळवळीतील सर्व भीमसैनिक व पदाधिकारी यांनी केलेल्या आवाहनानुसार,शुक्रवार दि.३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आयुक्त यांना समक्ष भेटून निवेदन देण्यात येणार आहे.यावेळी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याबाबत महत्त्वाच्या मागण्या मांडण्यात येणार आहेत.
प्रमुख मागण्या:
1️⃣ मनपा आवारात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा तात्काळ बसवावा.
2️⃣ मार्केटयार्ड चौकातील पूर्णाकृती पुतळ्याच्या परिसरात सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.
3️⃣ मार्केटयार्ड चौकाला दिलेले “विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक” हे नाव लवकरात लवकर अॅक्रीलिक बोर्डमध्ये लावण्यात यावे.
🗣️भीमसैनिकांची भूमिका:
या सर्व मागण्यांसंदर्भात एक औपचारिक निवेदन आयुक्तांना देण्यात येणार असून,या कार्यक्रमाला संपूर्ण आंबेडकरी समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा गौरव हा आमचा धर्म आहे,आणि त्यांच्या स्मारकांबद्दलची आदरभावना ही आमची जबाबदारी आहे,” असे मत स्थानिक भीमसैनिकांनी व्यक्त केले.
