जिल्ह्यात तीन दिवस मद्यविक्री बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश..’ कोरडा दिवस’ जाहीर.. ‘या’ तारखेला राहणार मद्यविक्री बंद..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुका शांततापूर्ण,मुक्त आणि नि:पक्षपाती वातावरणात पार पडाव्यात यासाठी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी जिल्ह्यात सलग तीन दिवस ‘कोरडा दिवस’ पाळण्याचे आदेश जारी केले आहेत.जिल्ह्यात २ डिसेंबर २०२५ रोजी संगमनेर, कोपरगाव,शिर्डी,राहाता, श्रीरामपूर,देवळाली प्रवरा,राहुरी, शेवगाव,पाथर्डी,जामखेड आणि श्रीगोंदा या ११ नगरपरिषदांमध्ये, तसेच नेवासा नगरपंचायतीमध्ये मतदान होणार आहे. तर ३ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी पार पडणार आहे.या तीन दिवसांमध्ये दारूविक्री संपूर्ण बंद..१ डिसेंबर : मतदानापूर्वीचा दिवस..२ डिसेंबर : मतदानाचा दिवस..३ डिसेंबर : मतमोजणी पूर्ण होईपर्यंत या दरम्यान सर्व प्रकारच्या
✔ मद्य,
✔ ताडी,
✔ बियर,
✔ तसेच इतर सर्व अबकारी अनुज्ञप्त्या पूर्णतः बंद राहणार आहेत.
या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांविरुद्ध महाराष्ट्र मद्यनिषेध व अबकारी कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी स्पष्ट केले आहे.निवडणुका सुरक्षित व शांततेत पार पडाव्यात यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलल्याचे या आदेशातून दिसून येते.
