शेवगाव दंगल प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय..तत्कालीन PI पुजारी यांच्या चौकशीसाठी जिल्ह्या बाहेरील DYSP करणार चौकशी..प्रा.किसन चव्हाण दंगलीच्या दिवशी शेवगावमध्ये नव्हतेच तरी खोटा गुन्हा दाखल
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-14 मे 2023 रोजी शेवगावमध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या मिरवणुकी दरम्यान उसळलेल्या हिंदू–मुस्लिम दंगलीच्या प्रकरणात एक मोठे वळण आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रा.किसनराव चव्हाण यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या कथित खोट्या गुन्ह्याबाबत जिल्हा व सत्र न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण आदेश देत तत्कालीन पी.आय. विलास पुजारी यांच्या तातडीच्या चौकशीचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना दिले.
◆ प्रा.किसन चव्हाण दंगलीच्या दिवशी शेवगावमध्ये नव्हते!
14 मे रोजी छ.संभाजीनगर येथे आयोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमासाठी गेलेले वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव प्रा.किसन चव्हाण सकाळी शेवगाववरून निघाले व रात्री 10.30 वाजता पुन्हा शेवगावला परतले.या कालावधीत शेवगावमध्ये दंगल घडून गेली होती.तरीही तत्कालीन डीवायएसपी संदीप मिटके, अजित पाटील,पीआय.विलास पुजारी व पोलीस अधिकारी संतोष मुटकूळे यांनी संगनमत करून त्यांच्यावर दंगलीचा आरोप लावून खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप प्रा.चव्हाण यांनी केला होता.
◆ कोर्टात खरी परिस्थिती मांडल्यानंतर जामीन मंजूर
प्रा.चव्हाण यांनी अटकपूर्व जामीन याचिकेतून घटनास्थळी नसल्याचे कोर्टात स्पष्ट होताच त्यांना जामीन मंजूर झाला.
◆ SC/ST कायद्यानुसार चौकशीची मागणी – दोन वर्षे पोलीस शांत!
यानंतर प्रा.चव्हाण यांनी सीआरपीसी 156(3) व भादवीसह SC/ST अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला.परंतु न्यायालयाच्या आदेशानंतरही दोन वर्षे शेवगाव पोलिसांनी चौकशीतील आपले म्हणणेच मांडले नाही.
◆ उच्च न्यायालयाचा झटका त्वरीत अहवाल द्या!
चौकशीतील विलंबा विरोधात दाखल याचिकेवर औरंगाबाद खंडपीठाने शेवगाव पोलिसांना त्वरीत चौकशी अहवाल सादर करा असा आदेश दिला.तरीही चौकशी लांबवली जात असल्याने गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
⭐ आजचा महत्त्वाचा निर्णय – जिल्ह्याबाहेरील DYSP करणार पी.आय. पुजारींची चौकशी!आज जिल्हा व सत्र न्यायाधीश महेश लोणे यांनी महत्त्वपूर्ण आदेश देत म्हटले
🔹पी.आय. विलास पुजारी यांची चौकशी जिल्ह्याबाहेरील डीवायएसपीकडून करावी
🔹दोन महिन्यांत चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करावा
🔹 या आदेशाची संपूर्ण जबाबदारी SP सोमनाथ घार्गे यांच्यावर असेल
◆ प्रा.किसन चव्हाण यांच्या बाजूने उभे राहिलेले विधिज्ञ
या संपूर्ण प्रकरणात प्रा. चव्हाण यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. दीपक शामदिरे, अॅड. कृणाल सरोदे, अॅड. शुभम जोशी व अॅड. किरण जाधव यांनी काम पाहिले.
