राष्ट्रसंत गाडगे महाराज पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह संपन्न
संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):-राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पदस्पर्शाने पवित्र भूमीत संगमनेर तालुक्यातील प्रती जेजुरी म्हणून प्रसिद्ध असलेले श्री क्षेत्र खंडोबा (देवगड) देवस्थान ट्रस्ट हिवरगाव पावसा येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.सन १९५२ मध्ये राष्ट्रसंत गाडगे महाराज उपस्थितीत हिवरगाव पावसा येथे ऐतिहासिक साप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.त्या ऐतिहासिक घटनेच्या निम्मिताने ७४ वर्षापासून हिवरगाव पावसा येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला जात आहे.यावर्षी राष्ट्रसंत गाडगे महाराज पुण्यतिथी निमित्त ७४ व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
ह.भ.प.श्रावण महाराज जगताप यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली. त्याप्रसंगी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने झाली. यावेळेस खंडोबा देवगड देवस्थान चा परिसर भक्ती माय व चैतन्यमय झाला होता. महिलांनी भक्ती गीते व फुगडी चा आनंद घेतला. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ह.भ.प.श्रावण महाराज जगताप यांच्याबरोबर फुगडी चा आनंद घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वृक्षमित्र गणपत पावसे यांनी केले.तर ह.भ.प.श्रावण महाराज जगताप यांचा सत्कार माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा सत्कार मच्छिंद्र गडाख, बाबू पावसे,दत्तात्रय पावसे यांनी केला.सामुदायिक महाप्रसादाचा लाभ भाविकांनी मोठ्या प्रमाणात घेतला.अखंड हरिनाम सप्ताह यशस्वी करण्यासाठी राजहंस दूध संघा मार्फत पाण्याचा टँकर तसेच सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सह.साखर कारखान्या मार्फत स्टेज सुविधा उपलब्ध करून देणे कमी सहकार्य राजहंस दूध संघाचे संचालक डॉ. प्रमोद पावसे,व जय मल्हार दूध उत्पादक संस्थेचे चेअरमन डॉ.संदीप पावसे यांनी केले.तसेच श्री क्षेत्र खंडोबा (देवगड) देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाबासाहेब पावसे,उपाध्यक्ष संतोष पावसे,सचिव अनिल गडाख,खजिनदार अण्णासाहेब शिंदे,तसेच विश्वस्त सोमनाथ पावसे,गणेश गडाख विकास पावसे,मधुकर शिंदे,अमीरत येरमल यांच्यासह सर्व देणगीदार, हिवरगाव पावसा ग्रामस्थ,खंडोबा भाविक भक्तांचे सहकार्य मिळाले.
