अहिल्यानगरमध्ये नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या इसमावर कोतवाली पोलिसांची मोठी कारवाई
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या नायलॉन मांजाची विक्री केल्याप्रकरणी कोतवाली पोलिस स्टेशन,अहिल्यानगर यांच्या वतीने प्रभावी कारवाई करण्यात आली आहे.केडगाव उपनगरातील शास्त्रीनगर येथे नायलॉन मांज विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.दि.२५ डिसेंबर २०२५ रोजी प्राप्त झालेल्या गुप्त बातमीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गुन्हे शोध पथकातील अमलदारांनी शास्त्रीनगर,केडगाव, अहिल्यानगर येथे सापळा रचला. कारवाई दरम्यान एक इसम संशयास्पदरीत्या पांढऱ्या रंगाचे गोन्याचे बॉक्स घेऊन उभा असल्याचे आढळून आले. पंचांसमक्ष तपासणी केली असता त्याच्या ताब्यातून “मोनो कॅट्स” व “हिरो प्लस” या नावाने ओळखले जाणारे नायलॉन मांजाचे एकूण ९० बंडल,प्रत्येकी १००० रुपये किंमतीचे, असा एकूण ९०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी आरोपीचे नाव एकनाथ अशोक विरकर (वय ३२ वर्षे, रा. शास्त्रीनगर, केडगाव, अहिल्यानगर) असे असून त्यास ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
त्याच्या विरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशन येथे पोलीस अंमलदार सुरज दिलीप कदम यांच्या फिर्यादीवरून पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम ५,१५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार बाळकृष्ण दौंड हे करीत आहेत.ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड,गुन्हे शोध पथकाचे पोहेकॉ.बाळकृष्ण दौंड,साबीर शेख,वसीम पठाण,विशाल दळवी,विनोद बोरगे, मपोहेकॉ. दरंदले,अविनाश वाकचौरे,विजय ठोंबरे,दीपक रोहकले,सत्यम शिंदे,सुरज कदम,अभय कदम, शिरीश तरटे,अतुल कोतकर, अमोल गाडे,सचिन लोळगे,राम हंडाळ,संकेत धीवर,अतुल कोतकर,अमोल गाडे,अतुल शेंडे, अतुल लाटे,तसेच दक्षिण मोबाईल सेलचे पोलीस अंमलदार राहुल गुंडू यांनी केली आहे.नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या नायलॉन मांजाच्या विक्रीविरोधात पोलिसांची ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून, पुढील काळातही अशा कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
