हिवरगाव पावसा जि.प.प्राथ.शाळेत राष्ट्रीय संत गाडगे महाराज यांना अभिवादन
संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):-संगमनेर तालुक्यातील राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या हिवरगाव पावसा या गावाचे एक अतूट नाते आहे.सन १९५२ मध्ये राष्ट्रसंत गाडगे महाराज उपस्थितीत हिवरगाव पावसा येथे ऐतिहासिक साप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.त्या ऐतिहासिक घटनेच्या निम्मिताने ७४ वर्षापासून हिवरगाव पावसा खंडोबा देवगड देवस्थान येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला जात आहे.स्वच्छतेचा शिक्षणाचा संदेश देणारे,अंधश्रद्धा रूढी परंपरेवर कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन जनजागृती करणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांना स्मृतिदिना निमित्त हिवरगाव पावसा जिल्हा परिषद शाळेत अभिवादन करण्यात आले.
सन १९५२ मध्ये राष्ट्रसंत गाडगे महाराज यांनी हिवरगाव पावसा येथे साप्ताहा निमित्ताने स्वच्छतेचा संदेश दिला,कीर्तन सेवा रुजू केलेली.आजही संत गाडगेबाबांच्या नावाने आपल्या हिवरगाव पावसा येथे सप्ताह होत असतो.भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी,गोरगरिबांना शिक्षण,वस्त्र,बेघरांना आसरा , आजारी माणसांना औषधोपचार, पशुपक्षी मुक्या प्राण्यांना अभय, दुःखी व निराशांना हिम्मत ,गरीब तरुण-तरुणींचे विवाह याबाबत गाडगे महाराज यांचे विचार समाजाला दिशा देणारे, मार्गदर्शन असल्याचे मुख्याध्यापक आर.पी.रहाणे यांनी अभिवादन पर म्हटले आहे.शिक्षक खतोडे सर,हरिभाऊ सहाने व बिडवे मॅडम यांनीही गाडगे महाराज यांच्या विषयी मार्गदर्शन केले.यावेळी उपसरपंच सुजाताई दवंगे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद पावसे,उपाध्यक्ष सोमनाथ भालेराव, सदस्य किरण पावसे, दीपक गुळवे,मंगल पावसे,सविता भालेराव,सुवर्णा हासे, सुशीला पावसे,पालक सदस्य महेंद्र भालेराव,शिवराज पावसे, आरोग्य सेविका स्वाती पावसे, सौ.दिवटे, मुख्याध्यापक आर पी राहणे,अक्षय खतोडे, हरिभाऊ सहाने, श्रीमती मीनल बिडवे आदी सह विद्यार्थी उपस्थित होते.
