हिवरगाव पावसा ते देवगड रस्त्यावरील उंच पुलाचे ना.विखे यांच्या हस्ते उद्घाटन..आद्यनृत्यांगणा पवळा यांच्या जन्मभूमीत भव्य स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देणार – पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे
संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):-संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील देवगड देवस्थान रस्त्यावरील उंच पुलाचे उद्घाटन जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.शाश्वत पाण्यापासून वंचित असलेल्या चंदनापुरी, सावरगावतळ, झोळे, हिवरगाव पावसा व शिरापूर या गावांना निळवंडे कलव्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी निळवंडे कालव्यावरून उपसा सिंचन योजना राबविण्यास पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी तत्त्वतः मान्यता दिली.तसेच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात मोलाचे योगदान देणाऱ्या तमाशा कलाक्षेत्रात प्रथम पदार्पण करणाऱ्या महिला आद्यनृत्यांगणा पवळा भालेराव हिवरगावकर यांच्या स्मारकास निधी उपलब्ध करून देण्याचे अभिवचन या प्रसंगी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांनी हिवरगाव पावसा ग्रामस्थांना दिले.
हिवरगाव पावसा ते देवगड देवस्थान दरम्यान ओढ्यावर असलेला छोटा पूल पावसाळ्यात पूर आल्यानंतर नेहमी पाण्याखाली जात असे.विद्यार्थ्यांना,दुचाकीस्वार स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असे.हि बाब लक्षात घेऊन सामाजिक संस्था,संघटना,पत्रकार यांनी आवाज उठवला.त्यानंतर उंच पुलाची गरज व गांभीर्य लक्षात घेता भाजपाचे जिल्हा पदाधिकारी काशिनाथ पावसे यांनी ही बाब ना.राधाकृष्ण विखे यांच्या निदर्शनास आणून दिली.भाजपाचे तालुका सरचिटणीस गणेश दवंगे,सरपंच सुभाष गडाख,केशव दवंगे,सोमनाथ भालेराव व इतर पदाधिकारी,कार्यकर्ते ग्रामस्थांच्या सहकार्याने मंत्रालय स्थरावर ग्रामविकास विभागाकडे मोठा पाठपुरावा केला.ना.राधाकृष्ण विखे,आमदार अमोल खताळ यांच्या सहकार्यामुळे हिवरगाव पावसा देवगड रस्त्यावरील उंच पुलासाठी अडीच कोटी रुपये निधी मंजूर झाला.सदरच्या पुलाचे उद्घाटन जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी बोलताना पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे म्हणाले की,हिवरगाव पावसा गावासाठी रस्ते,पूल, लाईट, देवगड देवस्थान साठी मोठा विकास निधी उपलब्ध करून दिला आहे. चंदनापुरी,सावरगावतळ,झोळे, हिवरगाव पावसा,शिरापूर या गावांना निळवंडे कलव्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी निळवंडे कालव्यावरून उपसा सिंचन योजना राबविण्यास आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्यात येईल. तसेच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात मोलाचे योगदान देणाऱ्या तमाशा कलाक्षेत्रात प्रथम पदार्पण करणाऱ्या महिला आद्यनृत्यांगणा पवळा भालेराव हिवरगावकर यांच्या स्मारकाचा प्रलंबित आहे.आद्यनृत्यांगणा पवळा यांच्या जन्मभूमी मध्ये भव्य स्मारकाच्या निर्मितीसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे अभिवचन पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे यांनी हिवरगाव पावसा ग्रामस्थांना दिले.सदर कार्यक्रमास चंदनापुरीचे माजी सरपंच प्रमोद रहाणे, शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ रहाणे,ग्रामपंचायत सदस्य श्याम रहाणे, भाजपा जिल्हा पदाधिकारी काशिनाथ पावसे,गणेश दवंगे, सरपंच सुभाष गडाख,सुजाता दवंगे,गोविंद खर्डे,अंकुश रहाणे, किसन सरोदे,नितीन रहाणे, केशव दवंगे,सोमनाथ भालेराव गणेश पावसे,प्रकाश पावसे,कैलास दिवटे,किरण पावसे,सुरेश पावसे, मच्छिंद्र पावसे,सचिन सस्कर,चंद्रशेखर गडाख,उत्तम जाधव,विलास पावसे,अशोक पावसे,अशोक गोफणे,बजरंग पावसे,रवींद्र पावसे,किरण पावसे,उत्तम जाधव,कैलास दिवटे, दिपक भालेराव,भाऊसाहेब बोऱ्हाडे,सचिन सस्कार,मच्छिंद्र गडाख,विनोद पावसे,माधव दवंगे,बाळासाहेब भालेराव,सोमनाथ दवंगे,विलास पावसे,सुधाकर पावसे यांच्या सह हिवरगाव पावसा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
