हिवरगाव पावसा येथे सांस्कृतिक कार्यक्रमातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मानवंदना..कला सम्राज्ञी पवळा कलामंचाच्या पुढाकारातून संवाद्य मिरवणूक
संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):-संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे कला सम्राज्ञी पवळा कला मंच आणि ग्रामपंचायत हिवरगाव पावसा यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.पारंपारिक सवाद्य मिरवणुकीत देवगड माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग घेतला.कला सम्राज्ञी पवळा कलामंच संस्थेचे कलावंत कवी गायक हरिश्चंद्र भालेराव आणि शाहीर मधुकर भालेराव यांनी लोककला व गाण्यांच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले यांना मानवंदना दिली.प्रबोधनात्मक गाण्यांनी विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले.
जयंती निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांचे विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमास सरपंच सुभाष गडाख, देवगड विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक रमेश पावसे,ज्येष्ठ संपादक यादवराव पावसे,सेवानिवृत्त शिक्षक प्राध्यापक बाबुराव पावसे,जि.प.प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आर.पी.राहणे,ग्रामपंचायत सदस्य भीमाशंकर पावसे, कला सम्राज्ञी पवळा कला मंचाचे सचिव नितीनचंद्र भालेराव,अण्णासाहेब गोसावी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.यावेळी विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा साकारत, वाजत गाजात संपूर्ण गावातून काढलेल्या मिरवणुकीने कार्यक्रमाची शोभा वाढवली. विद्यार्थ्यांनी भाषणे व गीते यांमधून सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. स्त्री शिक्षणासाठी त्यांनी केलेले संघर्ष,समाजसुधारणेचे कार्य आणि स्त्रियांना माणूस म्हणून सन्मान शिक्षणामुळे मिळत आहे.याचे सर्व श्रेय सावित्रीबाई फुले यांना दिले जाते. सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे महत्त्व विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांमधून विशद केले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सेवानिवृत्त शिक्षक प्रा.बाबुराव पावसे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे विशद करतांना सांगितले की,आज मुली शाळांमध्ये मुलांच्या बरोबरीने शिक्षण घेत आहेतच,शिवाय अनेक क्षेत्रांत मुलांच्या बरोबरीने यशाची शिखरे सर करत आहेत. हीच सावित्रीबाई फुले यांना दिलेली खरी आदरांजली असल्याचे त्यांनी नमूद केले. तर सरपंच सुभाष गडाख यांनी सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक कार्याची माहिती देत शिक्षणाबरोबर सती प्रथा बंदी, विधवा मुंडन,बालहत्या प्रतिबंधक गृह,मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी घेतलेले परिश्रमामुळे आज देश प्रगतीपथावर आहे.विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या त्यागाचे कार्याचे स्मरण ठेवून उज्वल यश संपादन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव नितीनचंद्र भालेराव यांनी केले.कला सम्राज्ञी पवळा कला मंच आणि महात्मा फुले,डॉ. आंबेडकर,राजर्षी शाहू विचारमंच संस्थेच्या वतीने खाऊचे वाटप करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक हरिभाऊ सहाने,श्रीमती मीनल बिडवे,देवगड विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनंदा उगले, विकास दारोळे,बच्चन भालेराव,बाळासाहेब भालेराव,प्रल्हाद मोकळ,गौरव दारोळे, करण दारोळे,मानव भालेराव,पंकज भालेराव, नारायण मोकळ,प्रवीण गडाख यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास अंगणवाडी शिक्षिका,अशा सेविका,ग्रामपंचायत कर्मचारी, देवगड माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी यांच्या सह हिवरगाव पावसा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
