प्रभाग ३ मध्ये सामाजिक कार्यकर्त्या प्राप्ती चव्हाण,ॲड.संदीप चव्हाण व डॉ.केतन दुथडे प्रचारात आघाडीवर..समाज विकास आघाडी पुढे विरोधकांची धावपळ वाढली
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी):-महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३ मध्ये समाज विकास आघाडीचे उमेदवार सामाजिक कार्यकर्त्या प्राप्ती संदीप चव्हाण,ॲड.संदीप चव्हाण आणि डॉ.केतन दुथडे यांनी प्रचाराचा वेग मोठ्या प्रमाणात वाढवला असून,प्रचारात स्पष्ट आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे.थेट जनतेच्या दारात जाऊन संवाद साधत,विकासाचा ठोस अजेंडा मांडत असल्यामुळे मतदारांमध्ये या तिघांबाबत मोठा विश्वास निर्माण झाला आहे.

वार्डातील विविध भागांत पदयात्रा, घराघरांत भेटी,नागरिकांशी समक्ष चर्चा,समस्या जाणून घेऊन तातडीच्या उपाययोजनांची ग्वाही देत समाज विकास आघाडीचे उमेदवार प्रचार करत आहेत. स्वच्छ पाणीपुरवठा,रस्ते,ड्रेनेज, आरोग्य,शिक्षण,महिला सक्षमीकरण,युवकांसाठी रोजगाराच्या संधी,ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा,तसेच सर्वसामान्यांच्या दैनंदिन प्रश्नांवर ठोस काम करण्याचे आश्वासन उमेदवारांकडून दिले जात आहे.

सुशिक्षित,अनुभवी आणि जनतेशी जोडलेले उमेदवार अशी ओळख असलेल्या या तिघांच्या प्रचारामुळे प्रभागात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. सामाजिक कार्यकर्त्या प्राप्ती चव्हाण यांनी महिलांच्या प्रश्नांवर सातत्याने काम केले असून,ॲड. संदीप चव्हाण यांनी कायदेशीर बाबींमध्ये नागरिकांना मोफत मार्गदर्शन देत विश्वास संपादन केला आहे.तर डॉ.केतन दुथडे यांनी आरोग्यसेवेतून गरजू नागरिकांना मोठा आधार दिला आहे.प्रचारात समाज विकास आघाडी आघाडीवर गेल्याने विरोधकांची मात्र चांगलीच धावपळ सुरू असल्याचे दिसून येत आहे.विविध माध्यमांतून टीका,अफवा पसरवण्याचे प्रयत्न होत असले तरी नागरिकांचा कल मात्र विकासाकडेच असल्याचे स्पष्ट जाणवत आहे.यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्त्या व उमेदवार प्राप्ती चव्हाण म्हणाल्या, “आम्ही केवळ आश्वासनं देत नाही तर प्रत्यक्ष काम करून दाखवतो. नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्या प्रामाणिकपणे सोडवण्याचा आमचा निर्धार आहे. जनतेचा मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता समाज विकास आघाडीचा विजय निश्चित आहे.

”एकूणच प्रभाग क्रमांक ३ मध्ये समाज विकास आघाडीचा प्रचार जोरात सुरू असून,विकास, विश्वास आणि कार्यक्षम नेतृत्व या त्रिसूत्रीवर आधारित प्रचारामुळे मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.येत्या निवडणुकीत समाज विकास आघाडी ऐतिहासिक विजय मिळवेल,असा विश्वास समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे.
