(प्रतिनिधी):-जिल्हापरिषद व पंचायत समित्यांच्या मतदान तारखेत बदल आता ५ ऐवजी ७ फेब्रुवारीला मतदान व ९ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे १२ जिल्हापरिषदा व त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखेत राज्य निवडणूक आयोगाने हा बदल केला आहे.
राज्यातील अनेक महापालिकाच्या महापौर उपमाहापौर निवडीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे.त्यासाठी ६ फेब्रुवारीला विशेष बैठका होणार आहेत. आता त्या तारखेत बदल होणार की ठरल्या प्रमाणे कार्यक्रम होणार याकडे लक्ष लागले आहे. अजितदादा यांच्या दशक्रिया विधीची तारीख आद्याप जाहीर झाली नाही. ती ६ फेब्रुवारी असू शकते. त्यामुळे नेमका काय बदल होतो, याकडे लक्ष आहे.
