पत्रकार दत्तात्रय घोलप यांचा ‘अहिल्यानगर भूषण’ पुरस्काराने गौरव..महंत रामगिरीजी महाराजांच्या हस्ते झाला सन्मान..पत्रकारितेतील सामाजिक बांधिलकीची दखल..
संगमनेर (प्रतिनिधी):-लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून समाजाला social work न्याय मिळवून देणारे युवा पत्रकार दत्तात्रय रामदास घोलप यांना गुरुवारी (दि.९ एप्रिल २०२६) ‘अहिल्यानगर भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.सरला बेटाचे महंत रामगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा दिमाखदार सोहळा पार पडला.भक्तीमय वातावरणात सन्मान संगमनेर तालुक्यातील कसारे येथे आयोजित ‘साईबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण’ सोहळ्याचे निमित्त साधून हा गौरव सोहळा पार पडला. बहुजन ग्रामीण विकास सेवा असोसिएशन संघाच्या वतीने दिला जाणारा हा मानाचा पुरस्कार दत्तात्रय घोलप यांना त्यांच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे, घोलप यांनी हा पुरस्कार आपल्या पत्नीसह स्वीकारला,ज्याचे उपस्थित जनसमुदायाने टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.पत्रकारितेतून समाजसेवेचा वसा काकडवाडी (ता.संगमनेर) येथील रहिवासी असलेल्या दत्तात्रय घोलप यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पत्रकारितेच्या क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.केवळ बातम्या देणे एवढ्यापुरते मर्यादित न राहता, त्यांनी गावकुसाबाहेरील प्रश्न, गरिबांच्या समस्या आणि विकासाच्या मुद्द्यांवर आपल्या लेखणीतून प्रहार केला.त्यांच्या या सामाजिक तळमळीची दखल घेऊनच बहुजन ग्रामविकास सेवा असोसिएशनने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली.
याप्रसंगी व्यासपीठावर हिंदू धर्मयुद्ध ह.भ.प.नवनाथ महाराज म्हस्के,नाशिक महानगरपालिकेचे नगरसेवक भागवतभाऊ आरोटे, कार्यक्रमाचे मुख्य आयोजक संतोषराव शेळके,बहुजन ग्रामविकास सेवा असोसिएशन संघाचे सचिव पत्रकार रामनाथ बोऱ्हाडे यांसह राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते.दत्तात्रय घोलप यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे संगमनेर तालुक्यासह पत्रकारिता क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या या यशाबद्दल विविध संस्थांचे पदाधिकारी, राजकीय नेते आणि ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.”पत्रकारिता हे केवळ प्रोफेशन नसून ती समाजसेवेची एक संधी आहे. सन्माननीय महंत रामगिरीजी महाराजांच्या हस्ते हा पुरस्कार मिळणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद आहे.या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी अधिक वाढली असून, जनसामान्यांच्या हितासाठी माझी लेखणी यापुढेही अशीच धडधडत राहील असे यावेळी पत्रकार दत्तात्रय घोलप यांनी आपले मनोगत व्यक्त केले.