भिमक्रांती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम..भीमजयंती निमित्त मिठाई वाटून व्यक्त केला आनंद!
सोलापूर (प्रतिनिधी):-भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून भिमक्रांती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने शहरात मिठाई वाटपाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि समाजात गोडवा निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला.यावेळी भीमजयंतीचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत होता.भिमक्रांती संस्थेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत ‘जय भीम’ आणि ‘जय संविधान’च्या घोषणा देत हा दिवस साजरा केला.या सोहळ्यासाठी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ. स्वातीताई अविनाश धाईंजे, अध्यक्ष शामकुमार लोंढे व किरण धाईंजे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच नगरसेविका मनिषाताई तिकोटे,नगरसेविका वैशालीताई भोसले आणि नगरसेविका प्रतिभाताई गायकवाड यांनी उपस्थित राहून या उपक्रमाचे कौतुक केले.
याप्रसंगी सचिव छायाताई माने,उपाध्यक्ष मैनाताई गायकवाड,शबानाताई शेख, शबनमताई मुलाणी,आसमाताई तांबोळी,राजश्रीताई पवार, पुजाताई माने,राजश्रीताई वाघमारे,किरणताई महेश पवार, वैशालीताई साळवे,मंगलताई नागरिक आणि कु.दिव्या दिदी धाईंजे यांची उपस्थिती होती.तसेच अविनाश धाईंजे,महेश पवार, संदीप गायकवाड, राहुल धाईंजे,विकी वाघमारे,भैय्या तिकोटे,राजू गायकवाड आणि मोठ्या संख्येने समाज बांधू-भगिनी उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. शेवटी जय भीमच्या जयघोषाने परिसराचा परिसर दुमदुमून गेला होता.
