अहमदनगर प्रतिनिधी (दि.२५ फेब्रुवारी):-या जगाशी भांडण्याचा फंद घ्यावा लागतो… पोळतांना हसण्याचा छंद घ्यावा लागतो… बोलते कविता जराशी…. मौन मंग सोडूनिया… अक्षरांना वेदनांचा गंध घ्यावा लागतो…. अशा नजाकत भर्या शद्बांनी चार तासांचे गजलयुग व्यापून गेले होते. दिवाणापनाचे काही ‘मुशायरे’ अन् लज्जतभरे ‘तरन्नुम’ घेऊन या गजलश्यामची रौनक उत्तरोत्तर आणखीनच रंगत गेली.तंन्जिमे उर्दू अदबच्यावतीने शिव जयंती निमित्त ऑल इंडिया मुशायरा मुकुंदनगर येथील एन.एम.गार्डन येथे दिलकश व जादुभर्या वातावरणात पार पडला. मुशायरात सर्व प्रथम मौलाना जींनी कुरान पठन केले. मुशायराला सहकार्य करणारे प्रमुख पाहुणे तंबोली हज टूर्स अँड ट्रॅव्हल्स चे संचालक हाजी शौकत भाई तांबोळी, अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष के के खान, उद्योजक करीम भाई हुंडेकरी, मराठी पत्रकार परिषद नाशिक विभागीय सचिव मन्सूर शेख, ज्येष्ठ नागरिक संघ मुकुंदनगर चे अध्यक्ष शाह निजाम,सामाजिक कार्यकर्ते अकबर भाई मुंबईवाला, इकरा सोसायटीचे उपाध्यक्ष इंजि. इकबाल सय्यद, रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलुलकर, वसीम ज्वेलर्स चे रिजवान शेख आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून देशभरातून आलेल्या कवींचा त्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यावेळी एकतेचा संदेश देणार्या मुशायर्याचे शिवजयंती निमित्त आयोजन करून खरे शिव संदेश मुशायराच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना कौतुक केले.या मुशायर्यात दर्दी रसिकांना नईम अख्तर खादमी बुरहानपुर,डॉ.अशफाक अंजुम मालेगाव,मंजुर नदीम अकोला,इब्राहिम खान बॅंगलौर,सैय्यद सलीमुद्दीन अमरावती,डॉ.नईम अख्तर मालेगाव, हामीद भुसावली, आरिफ़जमां बालापुर,तज्जमुल जाहीद भिवंडी,नफीस नांदोरवी, सुंदर मालेगांवी,नाज़ पुरवाई अमरावती,रेशमा तलत शबनम बॅंगलौर, व स्थानिक शायर खलील अहमद,आसिफ अहमद,सलीम यावर,डॉ.कमर सुरुर, नफीसा हया,हाजी बिलाल अहमदनगरी,अर्क अहमदनगरी, शरीफ खान, मुन्नवर हुसैन आदिंनी मदहोश आवाजानी रसिकांना मंत्रमुग्ध केले.समाजाचा वेगवेगळया विषयावर कविता सादर करुन शायरांनी टाळ्या व वाहऽ वाह.. ने संपूर्ण सभागृह वारंवार गाजत होता.या मुशायराच्या यशस्वितेसाठी तंन्जिमे उर्दू अदबचे अध्यक्ष सय्यद खलील,के के खान,कादिर सर,आसिफ सर, निसार बागवान,सलीम खान, नफीसा हया व सर्व पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.
