शिंगवे तुकाई येथे ‘शेतकरी प्रशिक्षण व नैसर्गिक शेतीशाळे’ चा जागर आधुनिक तंत्रज्ञानाचे दिले धडे..!कृषी विभागाचा स्तुत्य उपक्रम..खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नेवासा (प्रतिनिधी):-बदलत्या हवामानात शाश्वत शेतीकडे वळणे काळाची गरज बनली आहे. याच उद्देशाने नेवासा तालुक्यातील शिंगवे तुकाई येथे ‘खरीप हंगाम शेतकरी प्रशिक्षण, विविध कृषी तंत्रज्ञान प्रात्यक्षिक आणि नैसर्गिक शेतीशाळा’ अत्यंत उत्साहात संपन्न झाली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची मंत्रभूमीच खुली करून देण्यात आली.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंडळ कृषी अधिकारी श्री. बबन कराड साहेब यांनी कृषी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली. शेतकऱ्यांनी योजनांचा लाभ घेऊन आपली आर्थिक प्रगती कशी साधावी, यावर त्यांनी भर दिला. उपकृषी अधिकारी श्री. विजय बर्डे साहेब यांनी ‘महाडीबीटी’ (MahaDBT) पोर्टलद्वारे मिळणारे अनुदान आणि त्या प्रक्रियेतील पारदर्शकता यावर सखोल मार्गदर्शन केले.केवळ भाषणे न करता शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कृतीतून तंत्रज्ञान समजावून सांगण्यात आले.सहाय्यक कृषी अधिकारी श्री. गणेश भराट यांनी बियाणे उगवण क्षमता तपासणी आणि बीजप्रक्रियेचे महत्त्व प्रात्यक्षिकाद्वारे पटवून दिले.
सहाय्यक कृषी अधिकारी श्री. रुपेश प्रकाशराव पवार यांनी गांडूळ खत निर्मिती, जैविक खते तयार करणे, माती परीक्षण आणि बायोचार (Biochar) तंत्रज्ञानावर मार्गदर्शन केले. खरीप हंगामातील प्रमुख पिकांचे व्यवस्थापन कसे करावे, याचे सूक्ष्म नियोजन त्यांनी मांडले.नैसर्गिक आणि जैविक शेतीचा यशस्वी प्रयोग करून डाळिंब व इतर पिकांचे दर्जेदार उत्पादन घेणारे गावचे प्रगतशील शेतकरी श्री. बापू कुऱ्हाड यांचा कृषी विभागाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या यशोगाथेमुळे उपस्थित तरुण शेतकऱ्यांना मोठी प्रेरणा मिळाली.या कार्यक्रमाला युवा सरपंच श्री. दीपक भाऊ पवार, योगेश भाऊ सुरेश होंडे, माजी सहाय्यक कृषी अधिकारी दत्तात्रय दरंदले साहेब, संजय भिमाजी पवार, सदाशिव लक्ष्मण हसनाळे, मच्छिंद्र हरिभाऊ विधाटे, कारभारी सुर्यभान गायकवाड, कारभारी गंगाधर पुंड, गणेश चांगदेव खरपुडे, दिपक कचरू पुंड, सुनील भाऊसाहेब विधाटे, ज्ञानदेव विठ्ठल पवार, सुरेश नामदेव विधाटे, नवले प्रदिप, उंबर गणपत हवाले, किसन नामदेव पवार, पांडुरंग चिंतामण पवार, हरीभाऊ विठोबा शिंदे, शिवनाथ महाराज होंडे, अमोल नवनाथ पवार, चेतन राजेंद्र खरपुडे, गणेश खरपुडे, रामेश्वर अशोक पवार, सुदाम रामकृष्ण पवार, संतोष पवार, अमोल पवार, विठ्ठल कुऱ्हाट, भाऊसाहेब श्रीपती धायबर, केरू अहिल्याजी गवळी, संजय विठ्ठलराव होंडे, संभाजी कैलास आवारे, नवले प्रविण, सुनील पराजी विधाते, किशन रामभाऊ कुऱ्हाट यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचा समारोप आणि आभार प्रदर्शन श्री. योगेश भाऊ होंडे यांनी केले. या यशस्वी उपक्रमामुळे शिंगवे तुकाई परिसरात खरीप हंगामासाठी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
