शून्यातून विश्व उभारणारा भीमसैनिक..! वडिलांचा संघर्षाचा वारसा जपत समाजसेवेचा ध्यास; लखन भैय्या नाईकवाडे ठरत आहेत तरुणांसाठी प्रेरणास्थान..
धाराशिव जिल्हा प्रतिनिधी (बिलाल कुरेशी):-आंबेडकरी चळवळीचा समृद्ध वारसा जपत समाजासाठी आयुष्य समर्पित करणारे,रिपब्लिकन पक्ष (आरपीआय) पँथरचे माजी जिल्हा संघटक प्रकाश श्रावण नाईकवाडे यांनी अनेक वर्षे सामाजिक न्याय,समता आणि वंचितांच्या हक्कांसाठी अविरत संघर्ष केला.त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन त्यांचे सुपुत्र लखन भैय्या नाईकवाडे यांनीही समाजसेवा आणि स्वाभिमानाचा मार्ग स्वीकारला असून,आज ते तरुणांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून उदयास आले आहेत.
लहानपणापासूनच सामाजिक कार्याचे संस्कार लाभलेल्या लखन भैय्या नाईकवाडे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करत पुणे शहरात स्वतःचा व्यवसाय उभा केला. शून्यातून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज अनेक युवकांसाठी जिद्द, कष्ट आणि आत्मविश्वासाचे उदाहरण ठरत आहे.
व्यवसायात यश मिळवतानाच त्यांनी समाजाप्रती असलेली बांधिलकी कधीही विसरली नाही. आंबेडकरी चळवळीतील विविध सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या उपक्रमांमध्ये ते सातत्याने सक्रिय सहभाग घेतात. समाजातील गरजू, वंचित आणि अन्यायग्रस्तांच्या प्रश्नांसाठी ते नेहमीच पुढे सरसावतात. कोणत्याही समाजहिताच्या कार्यासाठी तत्पर राहणारे लखन भैय्या नाईकवाडे यांची कार्यपद्धती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
वडिलांनी जपलेली समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाची विचारधारा पुढे नेण्याचे कार्य लखन भैय्या नाईकवाडे अत्यंत प्रामाणिकपणे करत आहेत.
त्यांच्या कार्यामुळे परिसरात त्यांच्याविषयी आदराची भावना निर्माण झाली असून, युवकांमध्ये त्यांचा आदर्श घेतला जात आहे.सामाजिक बांधिलकी, संघर्षातून मिळवलेले यश, स्वाभिमानी विचार आणि आंबेडकरी चळवळीशी असलेली निष्ठा यामुळे लखन भैय्या नाईकवाडे यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. “संघर्ष हा यशाचा पाया असतो” हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले असून, त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाची चर्चा शिराढोणसह परिसरात मोठ्या अभिमानाने केली जात आहे.प्रकाश श्रावण नाईकवाडे यांचा संघर्षाचा वारसा आणि लखन भैय्या नाईकवाडे यांची समाजाभिमुख वाटचाल ही आंबेडकरी चळवळीसाठी प्रेरणादायी ठरत असून, समाजातील नव्या पिढीला सकारात्मक दिशा देणारी ठरत आहे.
