सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल घोरपडे यांची अहिल्यानगर जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी निवड!लोकाभिमुख कार्याची मोठी पावती..
संगमनेर (विशेष प्रतिनिधी, राजेंद्र मेढे):-अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय आणि विकासाच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे.जिल्ह्यातील शिवसेनेचे अभ्यासू आणि आक्रमक नेतृत्व,निळवंडे पाटपाणी लढ्यातील अग्रगण्य व्यक्तिमत्त्व,तसेच राज्याचे महसूल व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांचे खंदे व विश्वासू सहकारी विठ्ठल रावसाहेब घोरपडे यांची अहिल्यानगर जिल्हा नियोजन समितीच्या (DPC) विशेष निमंत्रित सदस्य म्हणून अधिकृत निवड करण्यात आली आहे.या निवडीचे पत्र मिळताच संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.विठ्ठल रावसाहेब घोरपडे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून संगमनेर तालुका आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध लोकहिताच्या प्रश्नांवर सातत्याने रस्त्यावर उतरून संघर्ष केला आहे.
विशेषतः शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा असलेल्या ‘निळवंडे पाटपाणी प्रश्ना’वर त्यांनी केलेला पाठपुरावा आणि दिलेला लढा सर्वश्रुत आहे. त्यांच्या याच सामाजिक, राजकीय आणि विकासाभिमुख कार्याची दखल घेऊन महायुती सरकारकडून त्यांना ही मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आता जिल्ह्याच्या विकास आराखड्यात आणि प्रक्रियेत त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.या निवडीची घोषणा होताच संगमनेर तालुक्यासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.विठ्ठल घोरपडे यांच्या रूपाने एका सर्वसामान्य आणि लढवय्या कार्यकर्त्याला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.या निवडीबद्दल राजेंद्र सोनवणे (तालुका अध्यक्ष, शिवसेना शिंदे गट संगमनेर), श्रीकांत सोनवणे (सदस्य, चिंचोली गुरव ग्रामपंचायत) तसेच रविदास सोनवणे (अध्यक्ष, संजय गांधी निराधार योजना) यांच्या वतीने विठ्ठल रावसाहेब घोरपडे यांचे विशेष व मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून, त्यांना पुढील भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.तालुक्यातील विविध राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनीही या निवडीचे स्वागत केले आहे.
