Maharashtra247

जिल्हापरिषदेत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

अहमदनगर प्रतिनिधी (दि.6. डिसेंबर):-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हा परिषदेतील शासकीय कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ.राजेन्द्र भोसले यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.याावेळी महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे,सहायक आयुक्त समाज कल्याण, राधाकिसन देवडे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर,उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनंजय आंधळे, कार्यकारी अभियंता श्री.गायसमुद्रे यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करत अभिवादन केले.या प्रसंगी जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page