अहमदनगर प्रतिनिधी (दि.6. डिसेंबर):- शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असणारे शिशु संगोपन संस्थेचे सेक्रेटरी रतीलाल कासवा यांना रुनिव्हर्सल मेंटओर्स असोसिएशनचा आंतरराष्ट्रीर स्तरावर प्रतिवर्षी संस्थांना दिला जाणारा वर्षीचा शिक्षा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.मुंबईच्या गोरेगाव बी.के. कॉम्प्लेक्स मधील सभागृहात आयोजित करन्यात आलेला चौथा एज्रुकेशन लिडर्स समिट 2022 मधे शानदार समारंभात असोसिएशनचे संस्थापक संदीप गुलाटी सरांचे हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.रुनिव्हर्सल मेंटओर्स असोसिएशनद्वारा आंतरराष्ट्रीर स्तरावर प्रतिवर्षी संस्थांना शिक्षा गौरव पुरस्कार देण्यात येतात. यंदाचा आंतरराष्ट्रीय शिक्षा गौरव पुरस्कार शिशु संगोपन संस्थेचे सेक्रेटरी रतीलाल कासवा यांना जाहीर करण्यात आला.गेली 45 वर्षे रतीलाल कासवा शिशु संगोपन संस्थेच्या माध्यामातून शैक्षणिक कार्रात असून शिशु संगोपन संस्थेची आपल्या सहकायांच्या मदतीने प्रगती केली आहे,शिशु संगोपन संस्थेमार्फत बालवाडीपासून ते बारावी (कला, वाणिज्र,व विज्ञान) शाखेच्रा शिक्षणाची अद्यरावत व्रवस्था करण्रात ते रशस्वी झाले आहेत,त्यांच्या या कार्याचा आंतराष्ट्रीय पातळीवर गौरव होताना संस्थेला विशेष आनंद होत आहे,अशी माहिती संस्थेचे व्हाईस चेअरमन दशरथ खोसे रांनी दिली आहे.पुरस्कार गौरव समारंभ प्रसंगी संस्थेचे चेअरमन दिलीप गुंदेचा,व्हाईस चेअरमन दशरथ खोसे,खजिनदार अॅड.विजय मुनोत,विश्वस्त रश्मी रेवलेकर,रमेश मुनोत,शिवनारारण वर्मा,प्रमोद गुगळे, सविता रमेश फिरोदिया प्रशालेच्या मुख्याध्यापिका योगिता गांधी,महेंद्र मधुकर वारे,कनिष्ठमहाविद्यालयाच्या प्राचार्या कांचन गावडे,विनोद कटारिया,शेखर अंधारे, जगदीश कोंगे उपस्थित होते.शिक्षण क्षेत्राच्या कार्यासाठी कासवा यांना पुरस्कार मिळाल्याने त्यांचा सत्कार जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य सुनील पंडित, शहर संघाचे अध्यक्ष ज्ञानदेव बेरड, मुख्याध्यापक शिदोरे सर संस्थेचे विश्वस्त, शिक्षक, कर्मचारी वृंद आदिंनी केला.
Trending Topics:
Trending
- ‘हॉटेल गुडलक’ ठरले बॅडलक..! मॅनेजर पदाच्या पूर्वतयारीवेळी तरुणाची हत्या..पळून जाण्याच्या बेतात असताना दोघांना एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!
- अहिल्यानगराच्या बदलत्या चेहऱ्याचे दर्शन;तोफखान्यात सिद्धेश्वर बाल मंडळाचा ‘विकासाचे महामेरु सुजयदादा’ देखावा ठरतोय लक्षवेधी..!
- स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद:एलसीबीची मोठी कारवाई,नागपूरचे ३ भामटे गजाआड!
- मध्यस्थी जीवावर बेतली..! कत्तीने सपासप वार करून तरुणास संपवलं;पळणाऱ्या नराधमाच्या अखेर एलसीबीने कल्याण मधून आवळल्या मुसक्या..
- सुसंस्कृत व राष्ट्रभक्त तेजस्वी पिढीची निर्मिती मातेच्या हाती..!श्रमिकनगर येथे विश्वमांगल्य सभेची बैठक उत्साहात संपन्न;मातृशक्तीचा जागर करण्याचे संयोजिका रजनी भंडारी यांचे आवाहन..
- गर्दीत प्राण वाचवणार प्रशिक्षित हात..! जिल्हा रुग्णालयातर्फे गणेश मंडळांना आता मिळणार CPR धडे..
- रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रची सुभेदारी विश्रामगृह येथे चिंतन बैठक संपन्न;संघटनात्मक बांधणीसह ऑक्टोबरमधील मेळाव्यावर भर!
- ‘त्या’ काळ्या स्कॉर्पिओवर पोलिसांचा छापा लाखोंची नामांकित दारू जप्त..अहिल्यानगर उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह?
