पारनेर प्रतिनिधी (दि.१० एप्रिल):-उभ्या जगाचा पोशिंदा आज जीवन मरणाची लढाई करत असुन शेती करणे ही एक प्रकारची शिक्षा आज बळीराजा भोगत असुन एकीकडे निसर्गाचा ढासाळलेला समतोल शेतकऱ्याच्या जिवावर उठला असुन दुसरीकडे शेतीसाठी रस्ता,पाणी,वीज यासाठी पिढ्यान पिढ्या संघर्ष करत असुन शासनाच्या योजना फक्त कागदावरच दिसत असुन प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना दिसत नाही त्याचा आक्रोश ऐकण्यासाठी अन्नदात्याने मोठ्या कष्टाने पिकवलेल्या अन्नाला खाताना तरी आठवण यायला हवी खोट भावनिक समर्थन देण्यापेक्षा बळीराज्याच्या पाठीशी राहणाराच आजच्या काळात वंदनीय ठरेल असे परखड मत सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी मांडले.पारनेर तालुका जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे, स्वातंत्र्यवीर सेनापती बापटांचा तालुका असुन या तालुक्याने अनेक मोठमोठ्या समाजहिताच्या चळवळींनी तालुक्याला दिशा दिली असुन याच पारनेर तालुक्यात सुरु झालेली शिवपाणंद शेतरस्त्यांची चळवळ राज्यभर पोहचली असुन चळवळीची प्रेरणा घेत अनेक तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शिव पाणंद शेतरस्तांची कामे होताना दिसत आहे परंतु अहमदनगर जिल्हयात आंदोलनाला गांभिर्याने घेत जिल्हाधिका-यांनी सप्तपदी अभियानातुन शिवपाणंद रस्ते खुले करण्यासाठी अवाहन केले असता पारनेर तालुक्यातुन सर्वाधिक शेतरस्त्यांचे अर्ज पारनेर तहसिलला देण्यात आले.परंतु तहसिल प्रशासनाकडून अर्जांना केराची टोपली दाखावण्यात आली त्यामुळे वाट पाहून कंटाळून अखेर पुन्हा पारनेर तालुक्यातील गावोगावचे शिवपाणंद शेतरस्ते,पाझर तलावांसह पुरातन जलस्रोतांच्या दुरुस्तीसाठी व शेतकऱ्यांना सप्तपदीचे फसवे आमिष दाखवणारे अधिकारी यांच्यावर दि.२४/०४/२०२३ पर्यंत कार्यवाही करावी अन्यथा पुन्हा नव्याने उभ्या झालेल्या शिव पाणंद शेतरस्ते, पुरातन जलस्रोत पुनर्जिवन चळवळीच्या माध्यमातुन पारनेर तालुक्यातील शेतकरी पारनेर तहसिल कार्यालयात पेरु वाटप आंदोलन करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांसह शेतरस्ते पिडीत शेतकरी भाऊसाहेब वाळुंज,रामदास खोमणे,दशरथ वाळुंज, बाळासाहेब औटी,संतोष लोणकर,हौशीराम कुदळे यांसह शेतकर्यांनी नायब तहसिलदार गणेश आढारी यांच्यासह पारनेर पोलिस स्टेशनला निवेदन दिले.
