अहमदनगर प्रतिनिधी (दि.१२ मे):-तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटरसायकल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला तोफखाना पोलीस ठाण्याच्या पथकाने मुद्देमालासह जेरबंद केल आहे. तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीच्या आधारे तोफखाना पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदारांनी मार्केटयार्ड परिसरामध्ये सापळा लावून एका इसमाला पाठलाग करून पकडले त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने त्याचे नाव मनोज गोरख मांजरे असे असल्याचे सांगितले व त्याच्या साथीदारासह मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली.त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे करण मनोज पवार,साहिल गफूर पठाण,योगेश सावळेराम मांजरे,उमेश दिलीप गायकवाड,शुभम अविनाश महांडुळे,यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 6 बुलेट 8 एचएफ डीलक्स 3 स्प्लेंडर 3 पॅशन प्रो 2 पल्सर 1 ऍक्सेस 1शाईन अशा एकूण 24 विविध कंपनीच्या 23 लाख 40 हजार रुपये किमतीच्या मोटरसायकली तोफखाना पोलीस ठाण्याच्या पथकाने जप्त केल्या आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे, यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे,सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे, पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके,पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय जपे,अविनाश वाघचौरे,धीरज खंडागळे, संदीप धामणे,वसीम पठाण, अहमद इनामदार,सचिन जगताप,सुरज वाबळे,सतीश त्रिभुवन,सतीश भोर,संदीप गिरे,गौतम सातपुते,दत्तात्रय कोतकर,शिरीष तरटे,तसेच तांत्रिक विभाग अहमदनगर दक्षिण पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत राठोड व नितीन शिंदे यांनी केली आहे.
