अहमदनगर प्रतिनिधी (दि.१२ मे):-नगर औरंगाबाद रोडवर हॉटेल गारवा समोर आरटीओ विभागातील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक चेतन दिलीप दासनूर,विलास धूम व वाहन चालक देवराम गीते असे मिळून विनापरमिटच्या वाहनांवर दि.११ मे रोजी कारवाई करत असताना हॉटेल गारवा समोर दोन अनोळखी इसम आले व कारवाई करत असताना त्याची शूटिंग करू लागले. तेव्हा घटनेतील फिर्यादी चेतन दिलीप दासनूर यांनी त्यांना विचारणा केली असता ते दोघे म्हणाले की तुम्ही मुद्दाम गरिबांना त्रास देता,तुम्ही असेच मरणार,असे म्हणून अंगावर धाऊन आले व सरकारी कामात अडथळा निर्माण केला.सदरील दोन्हीही इसम दारूच्या नशेमध्ये होते. व त्यानंतर ते दोघेही ह्युंदाई चार चाकी गाडीमध्ये तेथून निघून गेले.चेतन दासनूर यांनी तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहे.
