पारनेर प्रतिनिधी (दि.२० मे):- पारनेर तालुक्यातील सुपा, म्हसणे फाटा औद्योगिक वसाहतीमुळे पारनेरच्या वैभवात मोठी भर पडली असुन पारनेर तालुक्यासह जिल्ह्याच्या नव्हे तर देशाच्या अर्थकारणाला बळ मिळत आहे.अनेक शेतकऱ्यांनी औद्योगिक वसाहतीला आपल्या जमिनी दिल्या त्या शेतकऱ्यांना मोबदला मिळवण्यासाठी मोठा संघर्ष याठिकाणी करावा लागला. त्याचबरोबर कारेगाव,रांजणगाव,चाकण परिसरातील ठेकदारीचा अनुभव असणारे ठेकेदार याठीकाणी कामे घेण्यासाठी तुटून पडत असुन कंपनी व्यवस्थापनाकडे ठेकेदारांची रांग लागली आहे.यामुळे अनेक वेळा वादविवाद झाले आहेत.ठेकेदारीचा दर घसरत जावून अनेक ठेकेदार याठीकाणी तोट्यात आले त्यामुळे आपापसात संघर्ष वाढत चालला असून याचा परिसरात मोठा धोका निर्माण होवू शकतो त्याचबरोबर अनेक कंत्राटी कामगारांचे ओळखपत्र याठीकाणी व्हेरीफीकेशन सर्टिफिकेट यांची तपासणी होणे गरजेचे आहे कारण अनेक कंत्राटी कामगार विना सर्टिफिकेट काम करत आहेत.त्यामुळे परिसरासह कामगार,कंपनी व्यवस्थापन यामुळे अडचणीत येत आहे.यामुळे छोट्या मोठ्या गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना घडत आहेत. परिसरासह कामगार,कंपनी व्यवस्थापना समोर भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात टोळीयुद्ध घडू शकते त्यामुळे पोलिस प्रशासनाने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. कामगार आरोग्य,प्रदुषण, गुंडगिरी,फसवणुक,कंपनी, कामगार,स्थानिक सुरक्षा, दहशत अशा विविध प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सामाजिक,राजकीय,पत्रकार, पोलिस प्रशासन,आरोग्य विभाग,कामगार आयुक्त प्रतिनिधी आदींची संयुक्त शांतता सुव्यवस्था कमिटी बनवून औद्योगिकि करणा सह स्थानिक सुरक्षा,अर्थकारण यांचे संरक्षण करून एक आदर्श औद्योगिक वसाहत उभी करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे पोलिस निरीक्षक गडकरी यांना करण्यात आली आहे.यावेळी सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे,माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी पांडूरंग कळमकर,पत्रकार शरद रसाळ,सुदाम दरेकर आदी यावेळी उपस्थित होते.