नेवासा प्रतिनिधी:-नेवासा तालुक्यातील आदर्शगाव सुरेशनगर ग्रामपंचायतची बदनामी करून शासकीय कामांमध्ये अडथळा आणणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अन्यथा अहिल्यानगर जिल्हापरिषदेच्या कार्यालयासमोर दि.२६ जानेवारी रोजी उपोषण करू असा ईशारा महिला सरपंच शैलाताई कल्याणराव उभेदळ यांच्यासह ग्रा.पं.सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद अहिल्यानगर यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात सरपंच शैलाताई कल्याणराव उभेदळ उपसरपंच मैनाबाई नाथा बाबर,ग्रामपंचायत सदस्य भाकचंद पाडळे,विनोद बाजीराव निकाळजे,सुवर्णा सतीश क्षीरसागर,सुरेखा अशोक खंडागळे यांनी म्हटले आहे की आम्ही सरपंच,उपसरपंच,तथा ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कार्यालय सुरेशनगर तालुका नेवासा येथे सदस्थितीत कार्यरत असून मागील काही दिवसांपासून गावातील माजी सरपंच यांचे पुतणे अमृत सुरेशराव उभेदळ रा.सुरेशनगर तसेच ग्रामपंचायत सदस्य विकास पांडुरंग उभेदळ हे विविध कारणाने विविध कामासाठी ग्रामपंचायतच्या कामकाजाबाबत चौकशी अर्ज करत असतात.सदर कामी ग्रामपंचायत मार्फत आवश्यक ते सर्व दस्त व माहिती लेखी व मौखिक देण्यात येते.श्री.अमृत सुरेशराव उभेदळ यांच्या तक्रारी नुसार मौजे सुरेशनगर येथे १५ वा वित्त आयोग योजना अंतर्गत विहीरीतील गाळ काढणे,जाळी बसविणे व पाईपलाईन दुरुस्ती असे काम सन २०२२- २३ था आर्थिक वर्षात मंजूर होते सदरचे काम पाणी पुरवठा पाईप लाईन दुरुस्ती कामी बदल करणे संदर्भात ग्रामपंचायत मासिक सभा दि ०३.०२.२०२३ ठराव क्र ०८ ला अनुमोदन सभेत उपस्थित श्री.विकास पांडुरंग उभेदळ यांनी दिले आहे.तसेच सदरच्या कामाला प्रशासकीय मंजुरी, तांत्रिक मंजुरी, तसेच तीन दरपत्रके पद्धतीने आवश्यक त्या शासकीय नियमांच्या अधीन राहून काम पूर्ण करण्यात आले. सदर काम पूर्ण होऊन मा.अभियंता यांच्या काम पूर्णत्व दाखला मिळाल्या नंतरच आर्थिक सचोटीचे पालन करून बिलाची अदायगी झालेली आहे. तरी सुमारे दीड वर्ष झाल्यावर काम झाले नाही असे तथ्यहीन आरोप तक्रारदार करत आहेत.
तक्रारदार यांच्या प्रत्येक कामाला विविध तक्रारी वारंवार येत असतात.सदरच्या तक्रारीला निकाली काढणे संदर्भात वरिष्ठ कार्यालय,पंचायत समिती नेवासा तसेच आपल्या कार्यालय मार्फत मा.उपमुख्य कार्यकारी अधिकारी साहेब, जिल्हा परिषद अहिल्यानगर यांचे मार्फत वेळोवेळी तपासणी अंमलली आहे व त्याचा अहवाल प्राप्त होणे बाकी असून श्री अमृत सुरेश उभेदळ यांनी आपल्या जलसमाधी घेणार असल्या बाबत पत्रात तपासणी अधिकारी श्री सुजित भोंग विस्तार अधिकारी पंचायत समिती शेवगाव तसेच श्री भगवान बच्छाव सहा ग.वि.आ (ग्रा.पं) विभाग जि.प अहिल्यानगर यांना अहवाल येण्यापूर्वी धमकी – वजा इशारा दिल्याने सदर कामाचा अहवाल आमच्या विरोधात येण्याची शक्यता नाकारता येत नाही, तथापि येईल तो निर्णय आम्हास मान्य आहे.
सदर तक्रारदार इसमाला वरिष्ठ कार्यालयाची कोणतीही तपासणी मंजूर नसल्याचे आपल्या निर्दर्शनास आलेले असेल,अमृत सुरेश उभेदळ यांच्या कोणत्याही तक्रारीत काहीच तथ्य नसून त्यांच्या तक्रारी हया केवळ आणि केवळ राजकिय दोषातून व खाजगी कौटुंबिक वादा मुळेच करत आहेत या तक्रारीमुळे आमच्या गावात ग्रामपंचायत अधिकारी काम करण्यास तयार नाहीत, कोणतेही लोकोपयोगी काम करण्याअगोदर सदर इसम स्वतः किंवा इतराकरवी कामात अडथळे कसे निर्माण करावेत हेच कारस्थान करत असतो व शासकीय यंत्रणेला तक्रारदार इसम श्री अमृत सुरेश उभेदळ यांनी वेठीस धरल्याचे चित्र दिसत आहे.सरपंचपदी महिला असून सदर बाबत कोणत्याही प्रकारची तमा न बाळगता सदर तक्रारदार इसम महिला पदाचा वारंवार अपमान करतो, ग्रामपंचायत कार्यालय मध्ये येऊन सरपंच यांना अर्वाच्च भाषेत संभाषण करून दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत असतो.
म्हणून आम्ही असे निवेदन देतो की विविध वर्तमान पत्रातून आमची मानहानी व भ्रष्टाचार केले बाबत खोट्या व बिनबुडाच्या बातम्या सदर इसमामार्फत थांबविणे व खोट्या अफवा गावात पसरवून शासनाला वेठीस न धरावे हयावर त्वरित कारवाई करण्यात यावी तथा सदर इसमावर महिला सरपंच यांच्याशी इतर सदस्य समोर अर्वाच्च भाषेत संभाषण करून शासकीय कामात अडथळा केले प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात यावे अन्यथा आम्ही सर्व दि. २६ जाने २०२५ रोजी पासून जिल्हा परिषद अहिल्यानगर येथे आमरण उपोषण ला बसणार आहोत असा ईशारा निवेदनात दिला आहे.सदर निवेदनाच्या प्रती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर,जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह संबधीत खात्याच्या वरिष्ठांना देण्यात आले आहे.