अहिल्यानगर (दि.१४ प्रतिनिधी):-कै.गोपालभाई गुजर यांच्या १२ व्या पुण्यस्मरणानिमित्त झेन इलेक्ट्रिक कंपनी, एम.आय.डी.सी येथे भव्य रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले.शिबिराचे उद्घाटन स्नेहालयचे संस्थापक डॉ.गिरीश कुलकर्णी आणि उद्योजक श्री.मिलिंद कुलकर्णी यांच्या शुभहस्ते कै.गोपालभाई गुजर यांच्या स्मृतीला वंदन करून पार पडले.
यावेळी रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलचे प्रेसिडेंट श्री. कुणाल कोल्हे आणि सेक्रेटरी श्री.सुनिल कटारिया,आमी संघटनेचे अध्यक्ष श्री.जयद्रथ खाकाळ,श्री.संजय बंदिष्टी,श्री.ईशान कुलकर्णी,श्री.मिहीर कुलकर्णी यांची उपस्थिती होती.उद्योजक श्री.राजीव गुजर यांचे वडील कै.गोपालभाई गुजर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त मागील ११ वर्षांपासून झेन इलेक्ट्रिक कंपनी येथे रक्तदान शिबीर आयोजित केले जात आहे.यावेळी रक्तदान शिबिरात एकूण १०५ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले.यासाठी साईसेवा ब्लड सेंटर आणि जनकल्याण ब्लड सेंटर यांचे सहकार्य लाभले.
स्नेहालय संचालित केअरिंग फ्रेंड हॉस्पिटलद्वारा मोफत आरोग्य तपासणीचेही आयोजन करण्यात आले होते.एकूण ७३ जणांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झेन इलेक्ट्रिकचे श्री.दिपक बनकर,श्री.निलेश गुगळे व सर्व कर्मचारी वर्ग यांनी विशेष योगदान दिले.