वसई प्रतिनिधी:-महिला एकता संघ,अविण्य फाउंडेशन आणि नैसर्गिक पयावरण संवर्धन व मानवता विकास संस्था पालघर वसई तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र उपाध्यक्ष व भारतीय जनता पार्टी वसई विरार जिल्हा सचिव अपेक्षा हळदणकर यांच्या तर्फे महिला व पुरुषांना फ्री ॲक्युप्रेशर याची माहिती व प्रात्यक्षिक,प्रशिक्षण कॅम्प तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत शुभम एनक्लि्ह शॉप नंबर 3 ऋषी विहार कॉम्प्लेक्स समोर मनवेलपाडा रोड विरार येथे आयोजित करण्यात आला होता.
यावेळी अविण्य फाउंडेशनचे संचालक डॉ.सुशील सावंत व डॉ.अंजली सावंत यांनी उपस्थित मंडळींना नॅचरोपॅथी उपचार पद्धती बद्दल थोडक्यात माहिती सांगितली.आपण घरातीलच वस्तू वापरून आपल्या आजारांवर कसे उपचार करू शकतो याचे प्रात्यक्षिक दाखवले यावेळी महिला व पुरुषांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात होता.या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य सचिव व अविण्य फाउंडेशनचे सल्लागार श्री.बापू परब,वसई तालुका संघटक सौ.शरयू सावंत,अविण्य फाउंडेशनच्या वसई तालुका अध्यक्ष विद्या सावंत उपस्थित होत्या.
स्वराज्य जननी माँसाहेब जिजाऊ यांच्या जयंती निमित्त दोन वेगवेगळ्या ठिकाणी मानवता विकास वर आधारित कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पडले व कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या बद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानते व यापुढेही नागरिकांच्या आरोग्याबाबत विविध कॅम्प घेणार असल्याचे भारतीय जनता पार्टीच्या वसई विरार जिल्हा सचिव अपेक्षा हळदणकर यांनी सांगितले.