अहमदनगर प्रतिनिधी(दि.२० मे):-अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल कु.आचल रामदास सोनवणे पाटील यांचा शहरातील विघ्नहर्ता प्रतिष्ठान टीव्ही सेंटर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.कु.आचल रामदास सोनवणे पाटील यांनी पहिल्यांदाच बाजार समितीची निवडणूक लढवली यात त्यांचा मोठया मताधिक्याने विजय झाला.आणि विशेष म्हणजे कु.आचल रामदास सोनवणे पाटील ह्या बाजार समितीच्या निवडणुकीत उभे राहिलेल्या सर्व उमेदवारांपेक्षा सर्वात कमी वयाच्या आहेत.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सर्वाधिक मतदान घेऊन विजयी होण्याचा मानही कु.आचल रामदास सोनवणे पाटील यांना मिळाला आहे.नगर शहरातील सामाजिक कार्यकर्ते तसेच प्रतिष्ठित व्यक्तिमत्व पैलवान योगेश सोनवणे यांच्या त्या भगिनी आहेत.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवल्याने कु.आचल रामदास सोनवणे पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.यावेळी विघ्नहर्ता प्रतिष्ठानचे मार्गदर्शक पै.योगेशभाऊ सोनवणे पाटील,ज्ञानेश्वर कानडे,दत्तात्रय फटांगरे,सचिन तनपुरे,विशाल गायकवाड,विशाल म्हस्के,नंदकिशोर पेंडभाजे,अशोक कर्डिले तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.
