अहमदनगर प्रतिनिधी (दि.२० मे):-तहसीलदारांच्या पथकावर हल्ला करून गेल्या सात महीन्यांपासून विविध गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीस पकडण्यात भिंगार कॅम्प पोलीसांना यश आले आहे.बातमीतील हकीकत आशिकी दि.20/10/2022 रोजी फिर्यादी तहसील कार्यालयाचे पथकातील कर्मचारी असे मा.तहसीलदार यांचे आदेशाने मौजे कापुरवाडी गावात अवैध गौण खनिज उत्खनन याचे वर कारवाई करणे करीता कापुरवाडी शिवार येथे गेले असता त्यांना कापुरवाडी ते पिंपळगाव उज्जैनी जाणारे रोडवर सरकारी गट नं 269 चे पुर्व बाजुस,रस्तापासून अंदाजे 70 ते 80 मिटर अंतरावर विनापरवाना बेकायदा कापुरवाडी शिवारामध्ये सरकारी जागेत अवैध गौण खनिज उत्खनन करून ते ढंपर मध्ये भरण्याचे काम सुरू असताना मिळून आल्याने पथकातील कर्मचारी यांनी वाहने ताब्यात घेत असताना आरोपीतांनी गैर कायद्याची मंडळी जमवून संगणमत करून त्यांचा ईरादा पार पाडण्यासाठी फिर्यादी व पथकातील कर्मचारी यांचे अंगावर धावून जावून फिर्यादीस व पथकातील कर्मचारी यांना धक्काबुक्की,शिवीगाळ दमदाटी व हाताचे चापटीने मारहाण करून फिर्यादी व साक्षीदार हे सरकारी काम करीत असताना त्यांना कामात अडथळा करून ब्लास्टींग ट्रॅक्टर,पोकलंड व ढंपर हे पळवून घेऊन गेले बाबत दि.21/10/2022 रोजी कॅम्प पोस्टे गुरनं 478/2022 भादवि कलम 353,332,504, 506,143,147,149 सह खाण व खनिजे विकास व नियम अधिनियम 1957 चे कलम 21,महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48 प्रमाणे गुन्हा रजि.दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्यातील आरोपी नामे चांगदेव उर्फ भगवान गोवर्धन आढाव(वय 32 रा.पिंपळगाव उज्जैनी ता.जि.अहमदनगर) हा गुन्हा घडले दिनांकापासून फरार होता. दि.20/05/2023 रोजी गोपनिय माहीती मिळाली कि,सदर गुन्ह्यातील आरोपी नामे चांगदेव उर्फ भगवान गोवर्धन आढाव (वय 32 रा.पिंपळगाव उज्जैनी ता.जि.अहमदनगर) हा त्याचे राहते घरी मिळून येईल अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने भिंगार कॅम्प पोस्टे कडील खालील अधिकारी व अंमलदार यांनी आरोपी चा त्याचे राहते घरी जावून शोध घेतला असता तो त्याचे घरी मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन मा.न्यायालयासमोर हजर केले असता त्यास मा.न्यायालयाने 02 दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश बेंडकोळी हे करीत आहेत.सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अनिल कातकडे यांचे मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोस्टेचे सहा.पोलीस निरीक्षक श्री.दिनकर मुंडे,पोसई/मंगेश बेंडकोळी,पोसई/किरण सांळुंके,पोहेकाँ/संदिप घोडके, पोहेकाँ/रघूनाथ कुलांगे,पोना/राहुल द्वारके,पोना/दिलीप शिंदे,पोकाँ/रमेश दरेकर,पोकाँ/अमोल आव्हाड,पोकाँ/समीर शेख,पोकाँ/अविनाश कराळे,चापोकाँ/अरूण मोरे,पोकाँ/संतोष टेकाळे,मपोकाँ/श्रद्धा येणारे यांनी केली आहे.
