अहिल्यानगर (दि.१३ प्रतिनिधी):-प्रतिबंधीत नायलॉन मांज्या विक्री करणाऱ्या वरती तोफखाना पोलीसांनी कारवाई करत ३० हजार रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केला आहे. तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.आनंद कोकरे यांना गुप्त बातमी दारामार्फत माहीती मिळाली की नवरंग शाळेजवळ,तोफखाना अहिल्यानगर येथे एक इसम प्रतिबंधीत नायलॉन मांजा विक्री करत आहे.
पोनि.कोकरे यांनी सदर ठिकाणी जावुन खात्री करुन दुकानदारावरती कारवाई करा असे पोलिस पथकाला कळविल्याने सदर ठिकाणी जावुन पोलिसांनी खात्री केली असता इसम नामे ओंकार सुरेश कांबळे हा नायलॉन मांजा विक्री करताना मिळुन आला त्याचे कडे अधीक चौकशी केली असता त्यांचे कब्जात प्रतिबंधित केलेले नायलान मांजा एकण ३०.০००/- रुपये किमतीचे ६० नग नायलॉन मांजा MONo KTCFIGHTER नाव लिहलेले चकऱ्या मिळुन आल्याने त्यास मुदेमालासह ताब्यात घेवुन तोफखाना पोलीस स्टेशन येथे आणुन त्याचे वरती भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १२५ वगैरे प्रमाणे पोकॉ. म्हस्के यांनी गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पोहेकॉ.गर्जे हे करत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खेरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि.श्री आनंद कोकरे, सपोनि श्री.उज्चलसिंग राजपूत,पोउपनिरी श्री. सचिन रणशेवरे, पोउपनिरी.श्री.शेलेश पाटील,पोहेकॉं.दत्तात्रय जपे,सुनिल शिरसाट, अहमद इनामदार, भानुदास खेडकर,योगेश चव्हाण,गणेश धोत्रे, सुधीर खाडे,सुरज वाबळे,वसीम पठाण, पोकॉ.सुमीत गवळी, शिरीष तरटे,सतिष त्रिभुवन,दत्तात्रय कोतकर,बाळासाहेब भापसे,सतीष भवर,संदिप गि-हे यांनी केली आहे.