अहिल्यानगर (दि.१२ प्रतिनिधी):-चिचोंडी पाटील येथील गट नंबर १०२६ मधील १५१० क्षेत्र कुठलीही खरेदी न करता सुधीर भद्रे या व्यक्तीने बेकायदेशीर नावावर लावली आहे.
याबाबत अनेकदा संबंधित कार्यालयाला निवेदन दिले अर्ज केले तरीदेखील मूळ मालक कौसाबाई मारुती सरोदे यांच्या परिवाराला न्याय मिळाला नाही या न्यायासाठी आता उद्या दि.१३ जानेवारी रोजी नगर तहसीलदार कार्यालय येथे सरोदे कुटुंबीय व चिचोंडी पाटील गावचे सरपंच सरपंच शरद पवार आमरण उपोषणाला बसणार आहे.