संगमनेर प्रतिनिधी(दि.७ जुन):-सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भगवा मोर्चा संपल्यानंतर दुपारी अडीच वाजेच्या सुमारास काही जणांनी शहरातील नवीन नगर रस्त्यावरील इथापे हॉस्पिटलमध्ये घुसून एका कर्मचार्याला मारहाण केली. या रुग्णालयातील महिला कर्मचार्यांनी प्रतिकार केल्यामुळे मारहाण करणारे युवक पळून गेले.या प्रकरणी पोलिसांनी जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की,योगेश पांडुरंग कानवडे (रा.निमगाव पागा, ) हा डॉ.अशोक इथापे यांच्या गाडीवर चालक म्हणून काम करत आहे.दुपारी अडीच वाजता योगेश हा इथापे हॉस्पिटलच्या गेटच्या पाठीमागे फोनवर बोलत असताना अचानक कुटे हॉस्पिटल समोरून सात ते आठ जण धावत आले व म्हणाले की तू आमची मोबाईल मध्ये शूटिंग काढत आहे का असे म्हणून शिवीगाळ केली.कानवडे हा इथापे हॉस्पिटलमध्ये गेला असता त्याच्या पाठीमागे हे सात ते आठ जण आले व त्यांनी कानवडे याला हाताने मारहाण केली. हे भाडणे सोडवण्यासाठी हॉस्पिटलमधील कर्मचारी प्रकाश गायकवाड, रुपाली चौरे व सविता भालेराव हे तिघे आले. त्यांनी भांडणे सोडवली व या दोन्ही महिलांनी या सर्वांना हुसकून लावले. यावेळी महिलांनाही त्यांनी शिवीगाळ केली त्यानंतर पोलीस त्या ठिकाणी आले व पोलीसांनी याठिकाणी लाठी चार्ज केल्यावर हे सर्व पळून गेले.याप्रकरणी योगेश कानवडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी साहिल फिरोज सय्यद रा.पुनर्वसन कॉलनी, संगमनेर,आवेश शेख पूर्ण नाव माहीत नाही रा.मोमीन पुरा,संगमनेर,एजाज इस्माईल शेख रा.गवंडीपुरा,संगमनेर, अरबाज शेख रा.कुरण रोड, संगमनेर,तौफिक अकील शेख रा.पुनर्वसन कॉलनी, संगमनेर,अदनान शेख रा.मदिनानगर संगमनेर व इतर दोन इसम यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 457/2023 भादवी कलम 143, 147, 323, 504,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार करत आहेत.
