अहमदनगर प्रतिनिधी (दि.८ जुन):-सावेडी उपनगरात गणेश कॉलनी येथे राहणाऱ्या सौ.सुनंदा नंदकुमार चिंतामणी या त्यांच्या घराच्या गेट समोर उभा असताना रोडवरून समोर येणाऱ्या दुचाकी वरील तोंडाला रुमाल बांधलेल्या दोघांपैकी एकाने गाडीवरून उतरून त्याच्या खिशातील चिठ्ठी महिलेला दाखवून पत्ता विचारण्याच्या बहाण्याने गळ्यातील १२ ग्रॅम वजनाचे चाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण बळजबरीने ओढले व ते दोघे गाडीवर भरधाव वेगाने निघून नेले.हि घटना दि.७ जुन रोजी सकाळी ८ वा.सुमारास घडली असून सदरील महिलेने तोफखाना पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून भादविक ३९२,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास तोफखाना पोलीस करत आहेत.
