अन्न व औषध प्रशासनाची कारवाई ७ लाखाचा गुटखा पानमसाला जप्त दोन जणांवर गुन्हा दाखल
श्रीगोंदा प्रतिनिधी (दि.१२. डिसेंबर):-अन्न व औषध प्रशासनाने टाकलेल्या छाप्यात ७ लाख ८७ हजार १६५ रुपयांचा गुटखा व पान मसाला जप्त करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकारी क्रांती बारवकर यांनी माध्यमांना दिली आहे.अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्याना तांदळी परिसरात गुटखा तसेच पानमसाला विक्रीकरिता आल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.मिळालेल्या माहितीनुसार FDA ने सदरची कारवाई केली.या प्रकरणी अक्षय राजकुमार माळी (रा.तांदळी,ता.शिरूर), सद्दाम अन्वर शेख (रा. श्रीगोंदा) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.