अहमदनगर प्रतिनिधी (दि.१५ जुन):-कर्जत तालुक्यातील दुरगाव येथील अल्पवयीन मुलीस फुस लावुन पळवुन नेणारा व आरोपीस मदत करणारा अशा दोन आरोपींना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
बातमीची हकिगत अशी की, दिनांक 23/05/2023 रोजी म्हसोबा वस्ती,दुरगांव,ता. कर्जत येथील अल्पवयीन मुलीस अनोळखी इसमाने फुस लावुन अज्ञात कारणासाठी पळवुन नेले होते सदर घटनेबाबत फिर्यादी यांनी कर्जत पोलीस स्टेशन गु.र.नं.300/2023 भादविक 363, 366 (अ),212 बा.लै.अ.सं.अ.क.12 सह अ.जा.ज.अ.प्र.का.क.3 (2) (व्ही),3 (2) (व्हीए) प्रमाणे आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन श्री.राकेश ओला पोलीस अधिक्षक यांनी घटना ठिकाणास समक्ष भेट देवुन पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन गुन्ह्याचा समांतर तपास करुन फरार आरोपींचा शोध घेवुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/गणेश वारुळे,हेमंत थोरात,पोसई/तुषार धाकराव, पोहेकॉ/बबन मखरे,पोहेकॉ/सुनिल चव्हाण,दत्तात्रय हिंगडे,देवेंद्र शेलार,पोना/ रविंद्र कर्डीले,विशाल दळवी, गणेश भिंगारदे,फुरकान शेख, पोकॉ/रोहित मिसाळ,सागर ससाणे,रोहित येमुल,रणजीत जाधव,भाऊसाहेब काळे, बाळासाहेब गुंजाळ,अरुण मोरे,अमृत आढाव,मेघराज कोल्हे,प्रशांत राठोड,राहुल गुंडू व मपोना/भाग्यश्री भिटे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांची तीन वेगवेगळी पथके नेमुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.नमुद आदेशा प्रमाणे पथक आरोपी व पिडीतेची माहिती घेत असताना ते पनवेल,रायगड, कोल्हापुर व पुणे येथील त्यांचे नातेवाईक किंवा मित्रांकडे जाण्याची शक्यता असल्याने त्या दृष्टीने तपास करताना आरोपी हा पिडीतेस घेवुन अजमेर,राज्यस्थान येथे गेला असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने अजमेर राजस्थान येथे जावुन बस स्टॅण्ड व रेल्वे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पिडीत आरोपी व त्याचा साथीदार सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसुन आल्याने परिसरातील हॉटेल व लॉजेस चेक केले व परिसरातील खादीम,एजन्ट यांचेशी संपर्क करुन माहिती घेतली.तसेच अजमेर परिसरातील स्थानिक व्हॉट्सऍ़प ग्रुप व सोशल मिडीयाच्या मदतीने आरोपीचे फोटो प्रसिध्द करुन त्या आधारे तपास सुरु केला.परंतु आरोपीस पोलीस आपला शोध घेत असल्याची माहिती मिळाल्याने वारंवार जागा बदलुन राहत होते.दरम्यान स्थानिक व्हॉट्सऍ़प ग्रुपवरील माहितीचे आधारे बातमीदाराने आरोपी हे अजमेर येथुन जयपुर येथे गेल्याची माहिती दिली.पथकाने जयपुर येथे जावुन तपास करता आरोपी हे जयपुर येथुन सवाई माधवपुरा येथे गेल्याचे सीसीटीव्ही फुटेज वरुन दिसुन आले.पथकाने लागलीच सवाई माधवपुरा येथे जावुन तपास करता आरोपी नामे अजीज शेख याचा साथीदार हा मुंबईकडे जाणारे रेल्वे गाडीत बसताना दिसुन आल्याने सदर माहिती पोनि/श्री.दिनेश आहेर यांना कळविली.पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी लागलीच सपोनि/गणेश वारुळे व अंमलदार यांना मुंबई येथे जावुन सवाई माधवपुरा येथुन मुंबईमध्ये येणा-या रेल्वेची पहाणी करुन आरोपींना ताब्यात घेणे बाबत आदेश दिले.दिनांक 12/06/23 ते दिनांक 14/06/23 दरम्यान आलेल्या 8 ते 9 रेल्वे गाड्यांची प्रत्यक्ष जावुन पहाणी करता आरोपी नामे अजीम शेख यास मदत करणारा त्याचा साथीदार मिळुन आला त्यास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव मनोज बापु कटारे (वय 23 मुळ रा.लोणी मसदपुर,ता. कर्जत हल्ली रा.गौतमनगर, पवई झोपडपट्टी,मुंबई) असे सांगितले.त्यांचेकडे वर नमुद गुन्ह्यातील आरोपी व पिडीते बाबत विचारपुस करता त्याने मी,माझे कुटूंबिय व अजीम शेख व पिडीत असे अजमेर, जयपुर व सवाई माधवपुर येथे सोबत होते.आमचे आपसात वाद झाल्याने मी मुंबई येथे निघुन आलो व तो व पिडीता असे दोघे सुरत येथे उतरुन रेल्वेने हौद्राबाद येथे जाणार आहे अशी माहिती दिल्याने पथकाने लागलीच सुरत रेल्वे स्टेशन येथे जावुन हौद्राबादकडे जाणा-या रेल्वेगाडी बाबत विचारपुस करता गाडी चार तास उशिराने येणार असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने रेल्वे स्टेशन परिसरात पहाणी केली असता आरोपी व पिडीत मुलगी इकडे तिकडे संशयीतरित्या पाहताना दिसुन आले त्यांना शिताफीने ताब्यात घेवुन पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) अजीम खलील शेख वय 21, रा.थोटेवाडी,दुरगांव,ता. कर्जत व एक अल्पवयीन पिडीत मुलगी असे असल्याचे सांगितल्याने त्यांना ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेल्या आरोपीस कर्जत पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग,कर्जत हे करीत आहेत.सदर गुन्ह्याचे तपासात आरोपी नामे अजीम खलील शेख यास मदत करणारा त्याचा साथीदार नामे 2) मनोज बापु कटारे वय 23, मुळ रा.लोणीमसदपुर, ता. कर्जत हल्ली रा.गौतमनगर, पवई झोपडपट्टी, मुंबई 3) सईद शहाबुद्दीन शेख, वय 24, रा.स्वामी चिंचोली, शेखवस्ती,ता.दौंड,जिल्हा पुणे, 3) गोकुळ महादेव भांगे, वय 33,मुळ रा.थोटेवाडी, दुरगांव,ता. कर्जत हल्ली रा. पाटस, ता. दौंड, जिल्हा पुणे व 4) परवीन शेखलाल मुलानी वय 37,मुळ रा. भिगवन,ता.इंदापुर,जिल्हा पुणे हल्ली रा.राजेगांव,ता. दौंड,जिल्हा पुणे यांना आरोपी केले आहे.सदर गुन्ह्याचा सखोल व बारकाईने तपास करण्यात येवुन आरोपीस पळुन जाण्यास कोणी कोणी मदत केली अशा सर्व नातेवाईक व मित्रांना आरोपी करण्यात येणार आहे.यापुढे अल्पवयीन मुलींना पळुन जाणेकामी कोणीही सहकार्य केल्यास त्यांना सहआरोपी केले जाईल असे अवाहन श्री. राकेश ओला पोलीस अधिक्षक अहमदनगर यांनी केले आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक,श्री. विवेकानंद वाखारे, उपविभागीय पोलीस अधिकारी,कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
