अहमदनगर प्रतिनिधी (दि.९ जुलै):-साळवे क्लासेसच्या संचालिका प्रा.सौ.भारती संघर्ष साळवे यांच्या संकल्पनेतून साळवे क्लासेस व राजमाता कॉलनी यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपनाचा कार्यक्रम राजमाता कॉलनी येथे संपन्न झाला.यावेळी प्रा.भारती साळवे म्हणाल्या की नागरिकांनी आपल्या घरासमोर एक तरी वृक्ष लावले पाहिजे की ज्याने भविष्यात आपल्या पुढच्या पिढीलाही याचा उपयोग होईल वृक्ष लावले असता याचा ऑक्सीजन किंवा सावली म्हणून पर्जन्यमानासाठी याचा नक्कीच फायदा होईल.यावेळी क्लासेसचे विद्यार्थी तसेच कॉलनीतील श्री.संघर्ष साळवे,श्री.बाबा आढाव,श्री.संजय उमाप,श्री.दिलिप दरंदले,श्री.अमोल कणसे, सुचित गारुळे,संदेश शिरसाट आदी उपस्थित होते.
